श्री
श्री
आपल्या जीवनात बदल आणि स्थिरता, अशा दोन्ही गोष्टींचा समावेश राहतो. आपले रूप होणे, वावर असणे, संबंध प्रस्थापित होणे, विलीन होणे, दुसऱ्या सूक्ष्म स्तरात पदार्पण करणे हे कधी होईल, कसे होईल वगैरे "माहीत नाही". बुद्धीच्या सर्व सामान्य तर्कातून ओळखणे कठीण. एका चौकटीतून बुद्धी होते आणि तिची भाषा असते आणि तिचा वावर असतो. त्यामुळे व्याकुळता, भीती अशा गोष्टी निर्माण होतात आणि ते सोडवण्याच्या मागे बुद्धी लागते. चक्र.
सांगण्याच्या पद्धतीत संबंध, जर, तर, पहिले, नंतर अशा गोष्टी असतात...ह्याचा अर्थ की कुठे लक्ष दिले की गाठ सुटेल, अशी भूमिका ध्यानात असते. किंव्हा स्पष्टीकरण, सिद्ध अशा भावना असतात.
मुळात सर्व काही एकाच वेळेला स्थित असते, म्हणून पहिले काय आणि नंतर काय ह्याला फारसे महत्त्व असत नाही. सर्वांगीण शांत होणे अभिप्रेत आहे. तरीही बुद्धी दिलेली असल्यामुळे ती भाषा सोडणे कठीण. म्हणून आपल्या रूपातूनच पलीकडे स्थित व्हायला लागते. तो पर्यंत म्हणून प्रश्न, गाठ, भीती, बेचैनी, प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी ध्यानी येणारच.
मनाच्या गुण धर्माला स्वीकारावे. ते काही वाईट नाही. त्यातून ध्यान भगवंताकडे वळवावे.
हरि ओम

0 Comments:
Post a Comment
<< Home