श्री
श्री
भगवंत आत मध्ये जाणवण्यासाठीचा मार्ग गूढ असतो. म्हणजे त्या मार्गात कुठलीही परिस्थिती येऊ घालू शकते. त्यात आपली स्थिरता आणि भगवंताचे चिंतन डगमग होता कामा नये. ह्याचा अर्थ हा की पूर्ण लक्ष सूक्ष्म माध्यमाच्या कार्यावर केंद्रित रहावे, जेणे करून दृश्यात हालचालींची (घडामोडींची, संबंधांची, परिणामांची, गोष्टींची, बदलांची) भीती वाटणार नाही. मन - हे वासना, विचार, भावना आणि देह ह्यातून कार्य करते आणि त्या कार्याचा _परिणाम_ म्हणजे स्मरण/ अनुभव/ द्वैत/ दृश्य.
मनात जर जाणीव भगवंताच्या (किंवा शुद्ध) कार्याची संक्रांत झाली, तर परिणामही तसाच होईल, म्हणजे शांती रस प्रस्थापित होईल.
ह्याचा अर्थ की अस्तित्वात अनेक गोष्टी असतात ज्यामुळे "गुंतणे" हा अर्थ किंव्हा स्वभाव प्रस्थापित होतो. सर्वांगीण चिंतनाने सारे प्रकाराचे गुंतणे भगवंताशी संबंधित व्हायला लागतात आणि शुद्धता प्राप्त व्हायला लागते. तो अभ्यास चालू ठेवावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home