श्री
श्री
मनाचे अस्तित्व म्हणजे कुठेतरी ते गुंतून राहणार. गुंतणे ही खूप सूक्ष्मातून येणारी क्रिया आहे, ज्यात बऱ्याच स्तरांचे समावेश किंव्हा संबंध होऊन वासना, विचार, भावना आणि देह चक्र होते आणि त्याचा परिणाम म्हणजे दृश्य जग किंव्हा द्वैताचे दर्शन निर्माण होत राहणे आणि ते भोगणे. शक्तीचे कार्य राहणारच अस्तित्वात, आणि त्यातील एक कार्य म्हणजे आपले मन/जीवाचे स्मरण. मन ही शक्ती आहे, तिला व्ययक्तिक समजून सुख आणि दुःख आपण निर्माण करत राहतो आणि त्यात गुंततो. मन माझे नाही, तुझेही नाही. ते भगवंताचे मानले तर मनाच्या अंतःकरणात त्याला भेटू. म्हणून मनावर सतत नामाचा संस्कार करावा, म्हणजे पूर्ण शक्ती भगवंताकडे वळवावी.
दुसरा मुद्दा हा, की आपण/ मन नेहमी प्रवासात असतं. अनुभव येत राहणार, त्याचा प्रवाह असेल, त्यातून प्रश्न येतील, शोध असेल आणि त्यातून द्न्यानं कळेल. हे ही अपरिहार्य आहे. मन विघटित स्वरूपात असते. पण ते कालांतराने एक सत्याकडे येते आणि शांत होते. त्यासाठी "शोध" चालू राहते. ते शोध मोहीम समोर काहीही आणेल. ते स्वीकारावे आणि शांत रहावे. ह्याचा असाही अर्थ आहे की प्रवास कुणाला टाळता येत नाही. आजची परिस्थिती उद्या वेगळी होणार आणि हे चालू राहणार. त्या अर्थाने परिस्थितीत शांत रहावे आणि घाई करू नये प्रतिक्रिया द्यायला. सर्व योग्यच होत असते. आपली श्रद्धा हवी.
तिसरा मुद्दा की विषय समजून दुरुस्तीच्या मागे लागणे, म्हणजे आणखीनच त्यात उगाचच गुंतणे. एखादी गोष्ट मनात संक्रांत कशी होऊ पाहते हे गूढ असते, पण ती होतेच. कार्य सुरू असतेच.
अहं वृत्ती किंव्हा विघटित प्रकाराला चिटकवून राहिलो, तर आतील क्रिया तसे होत असते आणि कष्टी बनवत राहते. म्हणून अंतःकरण शांत होणे गरजेचे आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home