श्री
श्री
शांत असावे आणि सर्व हालचाली बघत रहावे. त्यात गुंतण्याची जरुरी नाही. गुंतण्याची गरज, म्हणजे हेतू निर्माण करून हालचालींना अर्थ देणे आणि प्रतिक्रिया देणे ह्याचा अर्थ आपण परावलंबित समजतो स्वतःला, चौकटीत व्यवहार करतो, वृत्तीतून स्मरण ठेवतो, तात्पुरते वाटून घेतो, *व्ययक्तिक* करून घेतो हालचालींना आणि म्हणून त्या अर्थाचे परिणाम साहजिकच भोगतो.
व्ययक्तिक वाटून घेण्याची काय गरज आहे घडामोडींना?!...हा अत्यंत गूढ प्रश्न आहे स्वतःसाठी. सर्व हालचाली भगवंताच्या शक्तीतून निर्माण होतात, ज्याला *कार्याची* उपमा दिलेली आहे. त्या कार्यामुळे अनेक रूप, आकार (स्मरण) जन्माला येतात, काही काळ वावरत राहतात आणि नंतर विरघळून जातात इतर रुपात.
संबंध, गुंतागुंती, परिणाम हे कुणालाच सुटलेले नाही. दृश्यात येणे म्हणजे हा संबंधांचा खटाटोप स्थित होणार. म्हणून मार्ग असा, की शांत आणि स्थिर होण्याची गरज. त्यासाठी कर्तव्य, सैय्यम आणि श्रद्धेचा उपयोग करणे गरजेचे ठरते - त्यातून हेतू किंव्हा गोष्टींचा अर्थ प्रज्वलित ठेवावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home