Saturday, June 20, 2026

श्री

 श्री 


अस्तित्व स्थितीत असताना, कार्याचा परिणाम मनावर खूप होत असतो - जो स्तर, संबंध, भाव, वासना, विचार, भावना, देह, स्मरण, जाणीव - अशा साऱ्या पद्धतीने मांडता येतो. ह्या सर्व हालचालींचे किंव्हा स्तरांचा परिणाम दृश्याशी संबंधितही असतो. थोडक्यात भगवंत भाव, अस्तित्व, जाणीव, मन, सबंध, दृश्य हे  अनुभव जोडलेले असतात. 

माझ्या मते, स्वतःला _विचार_ ह्या शक्तीशी नाते खूप महत्त्वाचे ठरते. असे वाटते की सूक्ष्म स्तर ते भावना आणि देह ह्या सर्वांचा परिणाम जर उमटत असेल आणि जाणवत असेल जीवाला तर तो आहे *विचारांचे* मध्यम. म्हणून विचारांना बहिर्मुख खेच असते (तसे नाते/ स्मरण/ गुंता/ अपेक्षा प्रस्थापित होते), *आणि* अंतर्मुख जाणण्याची ओढ (सूक्ष्म, स्थिर, कायम, सत्य अस्तित्व). इथे निश्चय लागतो की अस्तित्वाची जाणीव कशी प्रस्थापित करावी?  

असे म्हणतात की प्रारब्धाची सीमा देहा पुरती आणि नंतर विचारां पुरती मर्यादित ठरते. त्याहून जर जाणीव सूक्ष्म झाली, तर प्रारब्धाच्या पलीकडे अनुभव स्थित होऊ शकतात. मग इथे अनुभव ह्यांना देखील सीमा राहत नाही, किंव्हा ती स्थिर, सूक्ष्म, शांत होते. 

पण हे सर्व खरे असते, हे मान्य करावे लागते. त्यामुळे मार्ग जोपासला जातो आणि वरील सूक्ष्म अस्तित्व आत स्थिरावते.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home