Shree
Shree
Is life logical or beyond logic? What is logic? Are there states of logic? Is the logical, part of holistic vibrations?
Are questions meant to prove or justify or carry out a search for self? Should questions be expressed or should they get revealed as required?
विचार कसेही येऊ द्यावे, कारण त्यांना प्रसाद मानावा किंव्हा अस्तित्व कार्याचा एक भाग. प्रश्न सिद्ध करण्यासाठी असतात का, की ते नुसते असतात, नुसते निर्माण होतात, कुठेतरी वेगळाच अनुभव देतात आणि त्यातून वेगळे घडत जाते? There is a problem to view the _mind_ with a _function_ to question things, as if it was its sole purpose. Then that would mean a tendency to view a question in only a particular way and to perceive existence only in a particular way. कदाचित ह्यालाच गुंतणे किंव्हा अडकणे असे म्हणत असावेत!..किंव्हा अट्टाहास, अपेक्षा, अहं भाव!
A question needn't be a botheration. Question exists. And that's enough to keep revealing something or to keep the flow going.
Hari Om.
श्री
प्रत्येक क्षण नवा असतो. म्हणजे त्याला मागची धारा आणि पुढची धारा जरी संबंधित असली, तरीही ह्या दोघांचा परिणाम आपल्या *क्षणाच्या प्रत्यक्षातील अनुभवात होता कामा नये.* The moment should always be *fresh* in our minds.
ह्याला दुसऱ्या भाषेत असे म्हणतात की प्रत्येक क्षणी भगवंताचे अस्तित्व/ कर्तेपण/ कार्याची ओळख वर्धमान झाली पाहिजे. म्हणजेच की विचारांच्या धाराचा परिणाम शिथिल व्हायला हवा किंव्हा त्या धारात गुंतण्याची गरज भासता कामा नये किंव्हा जाणीव सूक्ष्म झाली हवी...सगळे तात्पर्य एकच आहे.
विचारांचे येणे, प्रवाह, परिणाम, स्वभाव, कर्म करण्याची इच्छा - सर्व ठिकाणी भगवंताची शक्ती कार्य करत आहे, असे जाणवले हवे. ह्याचाच अर्थ की भगवंताच्या सूक्ष्म शक्तीचे अनुसंधान टिकले हवे कुठल्याही विचारांच्या स्थितीत. म्हणजेच मन स्थिर झाले, असे समजावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home