श्री
श्री
जाणिवेला सत्य पाहिले, तर ते अमर्यादित असते. शुद्ध अस्तित्व म्हणजे जाणीवच आहे, त्याला आपण _कार्य_ असेही संबोधले आहे. सर्व सृष्टी _जाणिवेनी_ भरलेली असते. त्याच्या स्तरांमुळे, सूक्ष्म आणि शांत असलेली सृष्टी जड, स्थूल अणि अस्थिर वाटते. म्हणजे रूप आणि आकार हे जाणिवेचे _प्रतीक_ आहे. जशी जाणीव, तसा संबंध, तश्या हालचालींचे स्वरूप, तसे स्मरण, तश्या भावना, तसे आकार, तशी परिस्थिती, तसा परिणाम, वगैरे.
प्रारब्ध म्हणजे असे ओळखणे की दृश्याचा स्वभाव अस्तित्वामुळे प्रस्थापित होत राहणार आहेच, ज्याच्यामुळे ध्यानात अनुभवांचा प्रवाह असणार, प्रवास असणार, शोध असणार, विविध घटक असतील, प्रश्न असतील, सामोरे जाणे भाग येईल, वगैरे. प्रत्येक जन्म - मरण ह्या हालचालीत/ गतीत हे असे दिसणारच आहे.
जाणिवेला विचार आणि भावना (मन) मर्यादा तैय्यार करतात. त्यातून सारे संबंध येत राहतात, परिणाम भोगला जातो, परिस्थिती अनुभवली जाते. म्हणून जाणीव शुद्ध होऊ देणे महत्वाचे ठरते. प्रश्न जाणिवेचा आहे, कुठल्याही रूपाचा, आकाराचा, देहाचा, नात्यांचा, कामाचा नाही. आपण कोडी, बहिर्मुख असल्यामुळे, परिस्थितीत सोडवण्याचा प्रयत्न करतो - मग ते सर्व कोडी कामाशी, देहाशी, नात्यांशी, विचारांशी, भावनांशी निगडित असावीत असे आपण मानतो. हा अपुरेपणाच्या भावनांचा _परिणाम_ ओळखावा.
मूळ प्रश्न मनातून आहे, कार्याच्या स्वरुपात असतो. नाम म्हणून निर्हेतूने, समर्पण करत घ्यायला लागते. नामाचा विस्तार, भाव, कार्य, अनुभव जाणवण्याला खूप महत्त्व आहे. त्या नामाच्या कृपेची प्रार्थना करावी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home