Friday, June 26, 2026

श्री

 श्री 


आत्ता पर्यंत मी असे समजून घेत होतो की भगवंत कार्य किंव्हा भाव म्हणजे काय, जीव म्हणजे काय, त्यांच्यातील संबंध म्हणजे काय, स्मरण म्हणजे काय, मार्ग म्हणजे काय आणि विचारांचे + भावनांचे स्थान काय असते अनुभवात?

अस्तित्व कार्याला बरेच कंगोरे आहेत, ज्यांना आपण भगवंत, प्रकृती, हालचाली, भाव, विचार, संकल्पना, परिणाम, चक्र, हेतू असे काहीसे म्हणू. 

ह्यांची ओढाताण मनात होत राहते. विघटन आणि पूर्ण स्थिती - असे दोन भाव अस्तित्वात असतात. विघटनाचा मार्ग अधिक विघटित करतो आणि अंतर्मुख मार्ग स्वतःला पूर्ण करतो, शांत करतो. हा मोलाचा धडा आहे, कारण *निश्चय* त्यातून करायचा असतो. 

शंका असणार व्यवहारात गुंतत राहताना. पण त्याचे बीज समजून घ्यायला हवे आणि त्याचा स्वीकार करायला हवा. त्याला सैय्यम लागतो. मला वाटते की आकलनाच्या पलीकडे मन स्थिरावणे इतके नाम घेत रहावे. त्या मार्गावर जात राहताना खूप प्रकाराचे अनुभव येत राहतील जे स्वतःला बेचैनही करू शकतील. पण त्याच्या पलीकडे नजर कायम स्थित ठेवावी, म्हणजे अनुभवाचा योग्य स्वीकार होऊ शकतो. 

मी आहे तो असा आहे. अर्धवट वाटतच राहणार आहे, पण दोष स्वतःला किंव्हा परिस्थितीला किंव्हा कुठल्याही वस्तुला देण्याची गरज नाही. फक्त सर्व शांतीने बघावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home