श्री
श्री
भावना खूप गूढ असतात. आपण शब्द वापरून त्यांना राग, भीती, दुःख, गुंतून राहणे,चिकित्सा - असे काहीसे स्वरूप त्यांना देतो. स्वरूप देण्याच्या नादात अशी अपेक्षा होते की ते मर्यादित आहेत आणि त्यांना विषय म्हणून आपण सोडवू शकू आणि त्यांच्यामुळे आपल्यात दोष असावा.
स्वीकार करावा ह्या निर्माण झालेल्या परिस्थितीत. खूप बदल, संबंध, मने, धारा, नाती, हालचालींशी संबंध _प्रस्थापित_ होत राहतो. अगदी बाहेरील कुणा वस्तूवर नाही, तरी आतील सर्व स्तरांशी तर होतो! कुठल्याही संबंधांची निर्मिती भगवंत माध्यमातून प्रकट होते, म्हणून सर्व हालचाली आपल्या ध्यानात येत राहतात आणि त्यांच्यात गुंतले जाते, तसे स्मरण होते, तसे विचार येऊ पाहतात आणि तसे व्यवहार घडतात.
हे चक्र असे का असते आणि ध्यानात येते - ह्या _चिकित्सेत गुंतणे शिथिल होऊ द्यावे लागते_. चक्रातून ठामपणे "मी" अशी संकल्पना ठरत नाही. मी - हा भाव धारण झाला आहे, त्यामुळे त्याचा परिणाम ओढला जातो. मी - हा भाव शांत होत गेला, की सर्व _शांत_ म्हणून जाणवायला लागते.
अट्टाहासाने काहीही करू नये, घाई करू नये. योग्य पद्धतीने सर्व योग्य होते. आपण श्रद्धा बाळगावी. हालचाली, प्रवाह, विचार, भावना, वर्तन, शब्द, ऐकणे, बघणे, बोलणे - सर्व शांतीने करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home