Friday, June 26, 2026

श्री

 श्री 


स्वतः आतील विचारात गुंतून घेण्याची गरज नाही. मी भगवंत आहे, शांत आहे, सूक्ष्म आहे असे सतत आठवणीत राहू द्यावे. त्यासाठी प्रारब्धाची चिंता असू नये, त्यावर अवलंबून आणि सिद्ध होण्याची गरज प्रस्थापित करू नये,  सतत प्रतिक्रियेत राहण्याची गरज भासू नये. 

विचारातून चिंता निर्माण होत असली तर आपण प्रतिक्रिया देत आहोत, असे ओळखावे. एक तर अस्तित्वातून स्पंदने येणार. त्यातून वासना, विचार, भावना, देह अशा गोष्टीं द्वारे संबंध निर्माण होत राहणार, त्याचा परिणाम असणार, त्यात गुंतणे होणार. 

म्हणून _विचार_ किंव्हा त्याचा परिणाम शांती, ही भावना, प्रस्थापित होण्यासाठी महत्वाचे ठरते. आपल्या हातात *निर्णय* आहे. आणि तो असा घ्यावा की विचारातून योग्य *परिवर्तन* स्वतः मध्ये घडावे. त्याला कुणीही अडवू शकत नाही, शिवाय आपणच. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home