Saturday, July 25, 2026

श्री

 

श्री 

 प्रत्येक जीवाला सर्व स्तराच्या कार्यामुळे एक गूढ "प्रश्न" प्रस्थापित होतो ज्यात गुंतायला जाते. 

 माझ्यासाठी कदाचित हा प्रश्न असावा की क्रिया *का* करावी आणि त्यातून *सिद्ध* होण्याची गरज का निर्माण व्हावी?!! 

 हा प्रश्न इतरांना पटवणे अवघड आणि त्यात स्वतःलाच जळत राहायला लागतं आणि शेवटी मौल्यवान गोष्ट गवसते (असे संतांचे सुचवणे आहे). प्रश्नाचे उत्तर बाहेर नसून, संबंध प्रस्थापित होण्यात आहे आणि त्या संबंधांची रचना बदलण्यात दडलेले असावे. 

 प्रश्न बुद्धीने सुटतो का, रूपाने सुटतो का?....बहुतेक ज्या पद्धतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो, तसा तो सुटणे कठीण किंव्हा तिथे त्याचे उत्तर नसते. कितीही बुद्धीने चिकित्सा किंव्हा विघटन केले किंव्हा नवीन गोष्टी निर्माण केले, तरी त्यात ते गुंतून राहते, प्रवाह काही थांबत नाही आणि तात्पुरतेपण अनुभवास येते. हा प्रकार खूप गूढ आहे की त्यात वासना, बुद्धी, स्वभाव, दृश्य, संबंध, वस्तू, निर्मिती, हेतू - सर्वच्या सर्व मिसळले असतात. 

 हे पचनी व्हायला योग्य वेळ _द्यायला_ लागतो आणि त्यातून शांतीचा उलगडा होण्यास सुरुवात होते. 

 आपण भगवंताचे कार्य प्रस्थापित होण्यासाठी आलो आहोत. _हा भाव गूढ असतो_. 

 हरि ओम.

 

 

श्री 

 भगवंताचे अस्तित्व, म्हणजे कार्य, जाणून घेण्यासाठी आपल्या रूपातून, आकारातून, परिस्थितीतून, प्रवाहातून, संबंधातून, प्रवासातून त्याला आत्मसात करायला लागते आणि शांती भाव प्रस्थापित करायला लागते. आलेले अनुभव सत्य नसतात, तरीही त्यातून मार्गाची दिशा ध्यानी यायला लागते. 

 म्हणजे बघा काय होत आहे ते! जे सत्य नाही, त्या इतर कुठल्याही गोष्टीला मुल्य देऊन ती खरी आहे असे समजून घेणे आणि त्यात गुंतून राहणे, हा अनुभव पदरी येतो! त्यात मग प्रश्न निर्माण होतो की सत्य काय आहे?! आणि मग त्याचा शोध घेत, शांतीला आत्मसात केले जाते. 

 ज्या गोष्टीत गुंतायला होते, ते कुठून, का, कसे ध्यानात येते - हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते ओळखण्यासाठी मार्ग सुचविले आहेत संतांनी. आणि त्या मार्गावरून गेलो की निश्चित सत्य गवसु शकतं. 

 हरि ओम.

 

 

श्री 

 धावण्यात काही अर्थ नसतो, जर ध्येय निश्चित आत्मसात झाले नसेल तर. आपल्या आत शांती भाव आहे, त्यासाठी कुठे जाण्यासाठी गरज नसते किंव्हा वेगळे असे काही करण्याची गरज नसते....म्हणजे स्वार्थी किंव्हा मर्यादित वृत्ती ठेवून केलेले कार्य तसेच भोग देतात आणि गुंतवून ठेवतात. 

 ह्याचे आकलन व्हायला काळ जाऊ शकतो. आणि तो ओघाने द्यावाही. हालचालींचा अर्थ आणि संबंध आणि निर्मिती - ह्या गोष्टी मनाशी निगडित असतात. म्हणून ते जाणून घेण्यासाठी मार्ग पत्करावा लागतो. इथे जाणून घेणे, म्हणजे कोडी सोडवणे असा होत नाही. जाणून घेणे म्हणजे स्वतःच्या अर्थाला सत्यात विलीन करण्याची परवानगी देणे. 

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home