श्री
श्री
कदाचित माझ्यासाठी _त्याग_ भावना आत्मसात करणे अभिप्रेत असावे आणि ते सुद्धा शंका आणि श्रद्धेतून. Critical thinking.
विचारांचे स्थान, भावनांचे स्थान आणि त्यातून संबंधांचे स्वरूप, स्मरण, परिणाम - हा अनुभव "जीव" झाल्यामुळे/ त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे "प्रस्थापित होतो". ह्या होण्याच्या गोष्टीला शांत केले/ शांत होऊ दिले की जो अनुभव उरतो, तो असतो शांतीचाच. म्हणजे रूप आणि आकार गेले तरीही अस्तित्व असतेच.
हे जाणल्यावर सुद्धा त्या विलीन होण्याच्या क्रियेला सामोरे जायला लागते आणि खूप साऱ्या भावनांना स्वीकारावे लागते. विचार, भावना - एकंदरीत "पाहुण्या सारखे" त्याकडे बघावे. ते मुळात थोडे दिवस असतात आणि नंतर निघून जातात आणि हा प्रवाह सुरू राहतो.
ह्याचा अर्थ की पाहुण्यात गुंतून राहणे योग्य ठरत नाही, कर्तव्य करावे लागते, आपुलकी प्रस्थापित व्हावी लागते आणि देणे करावे लागते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home