Thursday, July 16, 2026

श्री

 श्री 


जीव खूप _परावलंबन_ , अशा संबंधात गुंतला गेला असतो - इतके की त्याचा ठाम पत्ता त्याला ओळखणे कठीण जाते. ह्याचा दुसरा अर्थ की भगवंताची शक्तीच कार्य करत असते, जिच्या अस्तित्वामुळे _जीव_ , हा भाव, प्रस्थापित होतो. हा सोप्पा अर्थ, खूप सोप्प झाल्या शिवाय ओळखणे कठीण जाते, कारण त्यात स्वतःचा अहं भाव मिसळून गोष्टी क्लिष्ट केल्या जातात. तरीही, स्वतः विघटित, परावलंबित आणि क्लिष्ट असून सुद्धा, परिस्थितीला टप्पा मानून मार्ग पत्करला जाऊ शकतो, ज्यामुळे सोपेपणा आत्मसात होऊ शकतो. स्वतःला सोपे करायचे असते. 

अहं भावाचे परिणाम अनंत. सत्व, रज, तम - अशा कुठल्याही स्वभावाचे जीव होतात त्यातून आणि त्यामुळे न्यूनपणा तैय्यार होतो. इथे प्रश्न आहे जीवाला. की ह्या भावनेतून सुटका असते का? असते, पण ती बुद्धीच्या मार्गातून बघण्यापेक्षा, तो मार्ग श्रद्धेचा असतो. श्रद्धेने आपण सूक्ष्म, अमर्यादित, स्थिर होतो. म्हणून ती भावना, जी कशावरही अवलंबून नाही, ती जागृत होऊ द्यावी. 

बुद्धीची शक्ती अजब प्रकरण आहे! त्यावर हक्क गाजवता येत नाही. सर्व घटक भगवंताकडून येतात, म्हणून त्या भावनेने बुद्धीकडे बघणे जरुरीचे ठरते. म्हणजेच की बुद्धीने वेगळेपण, गोष्टीना स्वरूप देणे, आकार देणे, प्रवाहाची मांडणी करू शकणे, प्रश्न निर्माण करणे, अपूर्ण असण्याचा अर्थ शोधणे, विश्लेषण तैय्यार करणे, कार्य प्रस्थापित होऊ देणे - अशा प्रवृत्ती असतात बुद्धीच्या.  "करणे" - हा _स्वभाव_ असतो/ बनतो बुद्धीचा. म्हणून कर्म तर होणार. 

हा स्वभाव जीवाने _धारण_ केला असतो...तो दिला गेला असतो. तोच स्वभाव परत भगवंताला द्यायचा असतो अपेक्षा न ठेवता. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home