श्री
श्री
सगळ्यांना स्मरण, भाव, रूप,
आकार आणि त्या प्रमाणे प्रवाहात राहणारी बुद्धी आणि भावना ध्यानात येत राहतात
आणि संबंध जोडतात. त्यामुळे वेगळेपण किंव्हा तात्पुरतेपण,
हा भाव संक्रांत होतो आणि तो प्रत्येक जीवाला गुंतवून ठेवतो. म्हणून प्रत्येक
जीवाला बेचैनी, भीती, व्याकुळता ही येतेच.
प्रश्न असा आहे, की अशा स्थितीत शांत होणे म्हणजे काय आणि ते कसे
साधायचे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटल्या शिवाय मार्ग
पत्करणे कठीण आणि त्यामुळे परिवर्तन होणे कठीण.
रूपाचा एक परिणाम घडतो, त्याचा एक स्वभाव असतो, त्यामुळे चक्र
प्रस्थापित होते. ह्यात बदल काय, संबंध काय,
साखळी काय, पाहिले काय आणि शेवट काय - ह्यात चिकित्सा करण्यात
विशेष तथ्य नाही...कारण मुळात तसे काही नसते, म्हणजे सर्व रूपाला
मर्यादा असतात आणि त्यांना निमित्त मानून सत्य ओळखावे लागते.
तरीही हे लिहिण्यात किंव्हा व्यवहारातही स्वतःचा स्वभाव असतोच,
म्हणून लिहिण्यावरून काम संपत नाही आणि त्यावर शांती ठरत नाही पूर्णपणे.
म्हणजे भगवंताला शरण जाणे हाच मार्ग ओळखावा.
सर्व अस्तित्व भगवंताचे असते आणि त्यात आपण कुठेतरी निर्माण होत राहतो आणि
विलीन होतो. हे हालचाली विधिलिखित असतात, म्हणून ते वाट्याला
येत राहणार. त्या हालचालींच्या चक्राच्या निमित्ताने भगवंताला ओळखावे.
हरि ओम.
श्री
"जत्रा" हा शब्द एक प्रकाराचा अनुभव दर्शवतो
माझ्या मते...ह्या शब्दातून गोंधळ, गोंगाट,
चळवळ, अस्थिरता, बेचैनी,
कष्ट, त्रास, घालमेल,
धावपळ - अशा सर्व भावनांचे मिश्रण होत असावे.
आपण बहुतांश बाजार किंवा गर्दीच्या कुठल्याही ठिकाणी वरील "जत्रा"
शब्द लावू शकू.
पण मनातील विचारांचे अमाप गोंधळ देखील "जत्रा" दर्शवते,
नाही का? हे उघड आहे की वाढत्या लोक संख्येमुळे रस्त्यावर,
कुठल्याही वास्तूत, शाळेत, बँकेत,
पर्यटक स्थानात - कुठेही जा, जत्रा अनुभवात येतेच
येते. पण, खूप विघटित मानसिक क्रियांमुळे (fragmentation
and multitasking), जत्रा, हा अनुभव, मनात संक्रांत होऊ
शकतो. म्हणजे मनाचा मार्ग जत्रा निर्मितीचा आहे आणि अध्यात्माचा मार्ग शांत
होण्याचा.
जीव म्हणलं तर मुळातच जत्रा, असा अनुभव,
संक्रांत होत असतो अनेक रूप आणि आकार बघत राहताना. ह्या जत्र्यांमध्ये शांती
भाव कसा प्रस्थापित होऊ द्यावे - हा मुळातील प्रश्न आहे आपल्याला.
हरि ओम.
श्री
एकाच वेळेला स्वतःचे मन सैरबैर खूप ठिकाणी गुंतून राहत असतं - नात्यात,
परिस्थितीत, रुपात, आकारात,
वृत्तीत, विचारात, भावनेत,
स्थळात, काळात, कामात,
समस्यात, विषयात, चिंतेत,
काळजीत, तात्पुरतेपणात, वगैरे....ह्याला अंत
नाही अशा स्वभावाला - म्हणजेच सत्य ओळखले तर ह्या प्रवाहित असणाऱ्या अनुभवाच्या
उगमाला "माझे" कर्तेपण नसते किंव्हा मी जबाबदार नसतो. जीवाची ही वरील _संकल्पना प्रकट_
होत असते आणि ती अस्तित्व माध्यमामुळे होत राहते. ह्या अनुभवाला प्रारब्ध,
भोग, देहबुद्धी, अस्थिरता असेही
संबोधले जाते.
प्रश्न असा आहे, की हे कशातून शांत होतं आणि शांत होणे असा अनुभव
महत्वाचा आहे का? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि मार्ग देखील त्याने
शोधणे गरजेचा आहे.
त्यासाठी "भगवंताचा" सत्यपणा पहिले मान्य करणे गरजेचा ठरतो आणि
त्यातून शांतीचा मार्ग पत्करला जातो. त्यातून श्रद्धा,
विलीन होणे, त्याग, अशा संस्कार मनाला
देत रहाणे ठरते.
हरि ओम.
श्री
"मी" हा भाव, क्षणाशी संबंध,
शक्तीचे कार्य, परिणाम, चक्र - ही सर्व
भगवंताची *इच्छा* ओळखावे.
*इच्छा* स्वतः सिद्ध आणि शांत माध्यम आहे,
ते अस्तित्व आहे, ते जिवंत आहे, त्याचे कार्य आहे.
इच्छे पोटी सर्व प्रकाराच्या हालचाली, सर्व स्तरात होत
राहतात. त्या इच्छेतून अनेकपणा किंव्हा विघटित कार्य होत राहते - पदार्थ घडल्या
जातात आणि मोडल्या जातात आणि हे कायम सुरू राहते.
कारण *अस्तित्व* असतेच, त्यावर निर्भर असलेल्या सर्व घटना स्थित राहतात
किंव्हा निर्माण होत राहतात. म्हणून अस्तित्वाला अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन अंग
आहेत, आणि त्या प्रमाणे अनुभवाचे स्वरूपही.
"गगनाहूनी वाढ नाम आहे",
असा उद्गार हरि पाठात उल्लेख केलेला आढळतो. म्हणजे स्वतःच्या अनुभवाचा _विस्तार_
अमर्यादित होऊ शकतो. म्हणजे अनुभवात स्तर, परिणाम,
स्मरण, भाव, कार्य,
व्यवहार, संकल्पना - ह्या साऱ्या गोष्टी येतात आणि त्यांच्या
आपसात संबंधातून शांतीकडे वाटचाल होऊ पाहते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home