श्री
श्री
अस्तित्व ह्याचा मूळ असण्याचे चिन्ह म्हणजे शांती भाव आणि त्यातून घडत राहणे कार्य.
आपण शांतीचे प्रतीक आहोत, कुठल्यातरी स्थितीत कार्य घडत राहते. मूळ कार्य भगवंताची शक्ती कारणीभूत असते, जिच्यामुळे आपला व्यवहार स्थित होतो, विचार येत राहतात, भावना येत राहतात, गुंतणे होते, स्मरण होते वगैरे. कुठल्याही रूपाला आणि आकाराला भगवंताची शक्ती _कारण_ ठरते.
आपण त्या शक्तीला बऱ्याच उपमा देतो. पण काहीही झाले, तरी ते शांती असते, ज्याला आपले रूप आणि आकार मागे टाकायला लागते. आपण संबंधात का येतो, हा गूढ प्रश्न आहे. त्याने व्याकुळ होण्याचे कारण नाही. तो प्रश्न शांती भाव आत्मसात करूनच पूर्ण ओळखता येईल.
मी - ह्या संकल्पनेला महत्त्व नाही. तरीही निमित्त म्हणून मार्गावर राहणे. तेवढा अधिकार दिला असतो. काय दिसते, त्यातून तर्क मांडू नये आणि कुणाला काहीही लेखू नये. इथे भगवंतच विराजमान आहे. त्याला ओळखावे.
हरि ओम.
श्री
प्रत्येक गोष्टीत, वस्तूत, प्रवाहात, चक्रात, भावात, जीवात शांत स्थिती किंव्हा भगवंत विराजमान असतो. त्याच्यामुळे हालचाली, कार्य, दृश्य जग, संबंध, विचार आणि भावना _घडत_ राहतात किंव्हा _निर्माण_ होत राहतात. Imagination.
तो आहे, म्हणून हे सर्व आहे. संबंध आत्मसात होण्यासाठी त्याचे सतत चिंतन करावे लागते, म्हणजे स्वतःत _परिवर्तन_ घडावे लागते.
त्याच्यामुळे _मी_ होत राहतो. मी, ह्या रूपाच्या पलीकडे त्याचे कार्य किंव्हा अस्तित्व असते, त्यामुळे बुद्धी किंव्हा भावना ह्यांना टप्पा मानायला लागते त्याला आत्मसात होऊ देण्यासाठी. टप्पा अर्थात विघटित किंव्हा आणखीन स्पष्टीकरण देण्याची साखळी नसते. स्पष्टीकरण दिल्याने सध्या काहीही फरक पडत नसतो, उलट वायफळ बडबड होण्याची शक्यता असते. ह्याला कारणही आहे. अहं भाव सतत सिद्ध होण्याचा प्रयत्न करत राहतो, म्हणून तो काहीही संकल्पना निर्माण करत राहतो, गोष्टी असो वा नसो. चिकित्सा करणे, विघटन करणे, बिंदू शोधत राहणे - ह्याने अहं भाव शांत होणे अवघड, कारण तोच तर त्याचा स्वभाव आहे! ह्यातून अपेक्षा, परिणाम, भोग, गुंतून राहणे - अश्या गोष्टी प्रस्थापित होत राहतात.
शांत होण्याचा एकच मार्ग हा की शांती भावनेचे संस्कार मनाला देत रहाणे. त्यासाठी भगवंताचे चिंतन करावे.
जाणीव नेणीव भगवंती नाही I
उच्चारणी पाही मोक्ष सदा II
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home