Saturday, July 18, 2026

श्री

श्री 

भगवंताचे चिंतन आणि कर्तव्य अनेक प्रकारे आपण करत असतो/ करू शकतो. 

ह्यातील मुख्य भाग आहे चांगले कर्म होण्याचे. हा अर्थ गूढ आहे, म्हणून त्याला अमर्यादित अर्थ आहे, किंव्हा सर्व स्तरात, काळात, स्थळात पसरला गेलेला अर्थ आहे. विस्तार बौद्धिक असावा का, हे सांगणे कठीण. विस्तार जाणिवेच्या पार्श्वभूमीवर झाला तर योग्य आहे. त्याचा मुख्य परिणाम म्हणजे सर्वांगीण शांती भाव प्रस्थापित होणे. 

म्हणून बुद्धी, चिकित्सा, चिंता, काळजी - ह्या गोष्टी चांगल्या कर्माना मर्यादा घालतात किंव्हा मर्यादित चक्र प्रस्थापित करतात. चक्र असणे स्वाभाविक आहे आणि त्याला महत्वाचा टप्पा समजावा विस्तारण्यासाठीचा. 

दुसरी गोष्ट अशी की स्थळ आणि काळावर चांगल्या कर्माचा अर्थ अवलंबून ठेवू नये. चांगले कर्म हातातून घडणे हा उस्फुर्त आणि स्थायी भाव बनायला हवा. सगळीकडे तेच स्पंदने पसरायला हवे. 

तिसरी गोष्ट की आपुलकी आणि स्वीकारण्याचा भाव देखील अमर्यादित असायला हवा. कुणी काहीही म्हणो, काहीही असो, कसेही हालचाली होऊ देवो...त्याच्याही पलीकडे आपुलकी पोहोचायला हवी. ह्याचा अर्थ हा की आपण दृश्यावर निर्णय आधारत नाही. 

चौथी गोष्ट ही, की सूक्ष्म भावना सांगण्याची गरज न भासू देणे. श्रद्धेने ओळखणे की सूक्ष्म होणे हे हिताचेच असते आणि त्याला कुठलाही वेगळा आधार किंव्हा स्पष्टीकरण लागू नये. 

पाचवी गोष्ट अशी की लोकांचे स्वभाव गूढ असतात आणि ते तशे का वागत राहतात, हे मांडणे कठीण असते बोली भाषेत. स्वीकार आणि आपुलकी त्यांच्यासाठी - ह्याला काळ द्यायला लागतो.

सहावी गोष्ट ही की ह्या प्रवासात जात राहताना वाचन, लिखाण, ऐकणे, बोलणे, शांत राहणे, निर्णय घेणे, मत देणे, स्वतःला सुरक्षित ठेवणे, मदत देणे - ह्या सर्व गोष्टींचा आधार त्या त्या वेळेला घेणे होते. तर तसे करावे आणि सर्व परिणाम भगवंताच्या शक्तीवर सोपवून द्यावे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home