Saturday, July 18, 2026

श्री

श्री 

चांगले कर्म करत राहणे, कारण ते कसे उपयोगी येत राहतील/ _परिणाम_ देतील येणाऱ्या काळात हे आज सांगणे कठीण. त्यालाच श्रद्धा म्हणायची, की आज आणि त्याचे फळ कसे असेल उद्यासाठी - हे चक्र शिथिल होऊ देणे. ते चक्र विचारात स्थित असते, म्हणून त्यातून परिस्थितीतील गोष्टींशी संबंध प्रस्थापित होत राहतात. काय असते विचारात की काल, आज आणि उद्या हे गुंतले गेलेले असते कुठल्यातरी आतील भावनेमुळे. मुळात कार्य करणारे माध्यम शांतीच असते. फक्त त्यात परिवर्तन होत, आपण एका वेगळ्या भावनेशी समरस झालेलो असतो आणि त्या प्रमाणे गोष्टी ध्यानात येत राहतात आणि परिणाम देत राहतात. त्या वेगळ्या भावनेमुळे आपण काल, आज आणि उद्याचे संबंध जोडतो. 

म्हणजे हा वेगळा भाव जो प्रकट होतो, तो शांतीतूनच आला असतो. ह्याचा अर्थ की काहीही अनुभवताना लक्ष शांतीकडे हवे/ सत्याकडे हवे. जशी सूर्याची किरणे सर्व व्यवहार उज्वलीत करतात, तसेच दृश्यात घडामोडी भगवंताची शक्ती चालवते. 

हा सत्य अनुभव स्थिरावण्यास, वेगळा असलेला भाव विलीन होणे गरजेचा ठरतो. विलीन होणे म्हणजे कुठल्याही परिस्थितीची आसक्ती कमी होणे आणि शांती भाव प्रस्थापित होऊ देणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home