Sunday, July 26, 2026

श्री

 श्री 


जाणीव नेणीव भगवंती नाही I 
उच्चारणी पाही मोक्ष सदा II 

भगवंत भाव प्रवाह द्वारे जाणून घ्यावे लागते - active engagement. माहीत असणे आणि कार्य करत राहणे, ह्यातून येणारे विचार वेगळे असतात आणि दोघांचीही जरुरी असते. 

नाम घेत रहाताना खूप प्रश्न, संबंधांचे स्वरूप, स्तर, परिस्थितीची चाहूल, हालचाली, मर्यादा अश्या सर्व गोष्टींची शहानिशा होते. ती होणे गरजेची आहे. त्या चिंतनातून आणखीन गूढ अर्थ नामाचा कळत जातो आणि त्यावर अधिकाधिक श्रद्धा बसत जाते. 

प्रश्नांचे स्वरूप बदलते, ते थांबते की नाही, हे माहित नाही. तसेच प्रवाहाचा अर्थ बदलत जातो, प्रवाह थांबत नसावा. तो अर्थ स्थिर झाला, तर प्रवाह वेगळा जाणवेल. 

म्हणून नाम सतत घेण्यावर भर दिलेला आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home