श्री
श्री
अस्तित्वाचे कारण स्वतःचे रूप - बुद्धी, भावना, देह शोधण्याचा प्रयत्न करत राहते त्याच्या त्याच्या भाषेतून. इथे लक्षात ठेवायला हवे की फक्त रूपाच्या भाषेला मर्यादा असू शकतात, म्हणून फक्त वरील मार्गातून पूर्ण समाधान आत्मसात होणे कठीण जाऊ शकते.
म्हणून आपल्या शक्तीच्या पलीकडे हालचाली, कार्य करण्याची क्षमता नामात असते, म्हणून नाम घेत रहावे आणि त्यात आपण समरस होऊन जावे.
आपले रूप सूक्ष्म माध्यमाच्या असण्यामुळे "निर्माण" झालेले असते आणि त्या प्रक्रियेत स्मरण, भाव, चक्र, परिणाम तैय्यार होते आणि त्याचीही एक विशिष्ठ क्रिया सुरू राहते. त्यात आलेले प्रश्न, त्याचा शोध, वगैरे ओघाने येते. त्यात गुंतायला होते, आसक्ती येते, व्याकुळ वाटते, तात्पुरतेपण येते (किंव्हा वाटते)...ह्या साऱ्या भावनांना आपण ध्यानात आणतो, आणि त्याचा परिणाम त्या बरोबरीने भोगतो.
हे चक्र एकदा स्पष्टपणे ध्यानात ओळखले, की मग ह्यातून शांत असण्याचा मार्ग पत्करला जातो. तिथे नामस्मरणाला श्रद्धेने आत्मसात करायला सुरू होते. आणि तसा अभ्यास शांतीकडे नेते.
हरि ओम.
श्री
*मार्ग* - ह्याचा अर्थ की प्रश्नाच्या बरोबरीने श्रद्धेच्या भावनाला आपण प्रकट करत आहोत आणि त्यात परिवर्तित स्वतःला करत आहोत. प्रश्न सर्व स्तरातील असतात, ते स्थूल ते सूक्ष्म स्थिती पर्यंत पोहोचत राहतात, ते सर्वांगीण असतात, बदलणारे असतात, परावलंबित असतात, स्वतःच्या रूपातून आलेले असतात, वगैरे. प्रश्न असणे, हे जीवाचे लक्षण आहे, म्हणून ते येऊ घालणार. त्यांना स्वीकारावे.
स्वीकार होणे - म्हणजे प्रश्न बघणे, त्याचा अभ्यास करणे, कुतुहलाने शोध घेणे, मर्यादा ओळखणे, श्रद्धा वाढवत राहणे, हे सर्व त्या बरोबरीने आले. आपण सत्याशी एकरस होण्यासाठी जन्म घेतला असतो आणि त्या करिता "भीती" ही भावना दिलेली असते तिथ पर्यंत नेण्यासाठी.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home