श्री
श्री
प्रत्येक क्षण अस्तित्वाचा तो भगवंताचा आहे, त्याच्या कार्याचा आहे, असे ओळखावे आणि जाणून घ्यावे. जे विचार, भावना, स्मरण, गुंतणे, चक्र, अनुभव, मनोरचना, संबंध, दृश्य वस्तू होऊ पाहते, ते सर्व वरील कार्यामुळे होत असते.
_होऊ पाहणे_, हा अस्तित्वाचा गुण आहे - म्हणून प्रवाह तो ध्यानी येणार आणि प्रवास तो घडणार. त्यातून सूक्ष्म स्थितीचा मार्ग मोकळा होऊ द्यावा लागतो आणि शांती स्थित होऊ द्यावी लागते. त्या अर्थाने दृश्य जग किंव्हा मी हे _निमित्त_ मानावे भगवंत होण्यासाठीचे. कुणी सांगितले की दृश्यात होणाऱ्या घडामोडी ते _खऱ्या_ असतात किंव्हा त्यांच्या परिणामांची चिकित्सा करावी आणि त्यातच गुंतावे?!
अहं भाव आपल्याला _गुंतायला_ उतावळा करत राहतो. गुंतायला काहीही कारण लागत नाही, किंबहुना कुठल्याही स्तरातील कारण पुरे ठरते! हेच गुढत्व पचनी होणे गरजेचे ठरते. स्वतःचे भाव विश्व खूप मर्यादित असते आणि त्या प्रकारे भोग झेलत राहते आणि त्यात आसक्तीने गुंतून राहते. मला तर अशी शंका आहे, की एका पद्धतीने खूप विघटन झाले, तर स्वतःला आणखीनच मर्यादित होण्याची जाणीव वाढत जाऊ शकते आणि त्यातून व्याकुळता अधिक होऊ शकते! Increase in dependence or variables may lead to further anxiety or feelings of limitations or loss of meaningful agency of control.
वरील गोष्ट प्रवचन मध्ये सुचविले आहे की मनाने दाखवलेला मार्ग (आत्ताच्या काळात AI), म्हणून टीकेच्या स्वरूपात बघायला लागतो आणि उचित मार्ग हा कोणता, ह्याचा शोध सुरू होऊ द्यावा लागतो.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home