श्री
श्री
आपल्या आसपासच्या सतत बदलणाऱ्या गोष्टी बघून हैराण व्हायला होते. असे वाटू शकते की अशी एकही वस्तू नाही, की स्थिर आहे आणि ती आधार देऊ शकते. म्हणजे थोडक्यात जे बघतो, ती एक बदलत राहणारी अस्थिर परिस्थिती असावी.
पण ह्या मध्ये एक रहस्य जाणवायला हवे. वरील _अनुभव_ तेव्हाच येतो जेव्हा कुठेतरी स्थिर, न बदलणारे माध्यम अस्तित्वात असते आणि त्या पार्श्वभूमीवर इतर आतील ते बाहेरील _हालचाली_ जाणवत राहतात आणि नंतर असेही जाणवू शकते की स्थिर आणि सूक्ष्म माध्यमाचे कार्य म्हणून सर्व स्तर प्रस्थापित होतात आणि एकमेकांशी संबंध ठेवतात! त्याच कार्याचा एक परिणाम म्हणजे स्वतःचे स्मरण!
ह्याचा दुसरा अर्थ असाही जाणिवेत येऊ शकतो की ते स्थिर माध्यम एकच, सर्वव्यापी असते आणि प्रत्येक जीवाच्या केंद्रस्थानी असते, ज्यामुळे जीवाचा स्वभाव होतो आणि प्रवास केल्यासारखा वाटायला लागतो. म्हणजे आत कुठेतरी भगवंताचे स्थान असले हवे खास!
आत जाण्यासाठी मार्ग पत्करणे येते. त्यातील एक मार्ग म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
अस्तित्व शक्तीचे कार्य असते आणि त्यात गुणांचा समावेश होऊन निर्मिती घडते, किंव्हा हालचाली होत राहतात. त्यामुळे स्मरण येते, प्रवाहात राहते आणि रूप आणि आकाराला धरून राहते/ त्यात गुंतते.
हेतू मुळे गुंतणे प्रज्वलित राहते. तो हेतू भगवंताच्या (सत्याच्या) विस्मरणामुळे निर्माण होते, म्हणून त्यामुळे स्वभाव होतो. कार्याचा एक परिणाम म्हणजे व्ययक्तिक स्मरण प्रकट होणे आणि व्यवहारात राहणे.
हे जेव्हा जाणवते, तेव्हा शांत होण्याचा मार्ग पत्करला जातो. कालांतराने सत्य आत्मसात होते. काळ बाहेरील असतो, आतील असतो, स्तरातील असतो, स्थूल असतो, सूक्ष्म असतो, बदलणारा असतो, स्थिर असतो.
हरि ओम.
श्री
स्पष्टीकरणे, हे विघटन, सिद्ध होणे, स्मरणात गुंतून राहणे असे सुचवते. त्याच्या अगोदर तसे करण्याची वृत्ती म्हणजे बौद्धिक ताबा मिळवणे एखाद्या परिस्थितीवर आणि पळवाट शोधणे परिस्थितीतून. दोन्ही वृत्तीतून सत्य काय असते जाणिवेत - हे मान्य होत नाही कुणालाच...म्हणजे शेवटी मतभेद होण्याची शक्यता होते स्पष्टीकरणेत.
थोडक्यात जसे सत्य आत्मसात होऊ पाहते, तशी स्पष्टीकरण देण्याची इच्छा मावळते. त्याचा अर्थ बुद्धी शांत होते आणि तिच्या पलीकडे अस्तित्वाचे कार्य जाणवते. एका प्रकारे कार्य म्हणजे विघटित क्रिया आणि त्यातून होणारे स्मरण. पण शुद्ध अस्तित्वात, कार्य म्हणजे "नुसते असणे" ज्यात विघटित क्रिया देखील मावळून गेली असते.
अध्यात्माच्या मार्गात, आपण कार्याची व्याख्या अधिकाधिक सूक्ष्म, स्थिर समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो - म्हणजे सर्व सामान्य कार्याच्या अर्थाच्या उलट. त्याला खूप आतील निग्रह, सैय्यम, श्रद्धा लागते.
सर्व सामान्य बहिर्मुख वृत्ती दृश्यात वावरत असते आणि तसे आपले स्मरण होत राहते. त्याच्या उलट मनाला अंतर्मुख होण्याचे संस्कार वाढवत राहायला लागतात - म्हणून तश्या कठोर प्रश्नांना, व्याकुळतेला, आतील त्रासिक भावनांना, सैय्यम ठेवायला, श्रद्धेला सामोरे जाणे भाग पडते. अंतर्मुख होण्याच्या प्रवासाला येणाऱ्या अवस्थांना शांत होऊन स्वीकारावे लागते आणि सूक्ष्म होत जायला लागते.
हरि ओम.
श्री
प्रत्येक शक्तीच्या रूपाचे, स्तराचे कार्य निर्माण होते...म्हणजे त्यात साखळी, क्रिया, विघटन, स्मरण, चक्र, भाव, परिणाम, अर्थ, भोग - ह्या गोष्टी निर्माण होत राहतात, वावरत राहतात आणि बदलून निघून जातात. ह्याला "अस्थिरपणा" म्हणतो आणि त्याच्यात खूप गुंतायला होते. ते गुंतणे अनेक घटकांमुळे, बुद्धीमुळे, भावनेमुळे, देहामुळे होत राहते. त्यांच्या त्यांच्यातही संबंध असते, म्हणून कुठल्याही निर्माण झालेल्या परिस्थितीत बुद्धी, भावना, देह ह्यातून अर्थ मिसळला गेला असतो.
त्याच बरोबर जीवाच्या शक्तित असे प्रश्न येतात, जेणेकरून सत्याचा शोध आत्मसात होऊ शकतो.
प्रश्नाला शांतीने जोपासावे, कारण आत खोलवर खूप व्याकुळ करणारे सूक्ष्म भावना प्रस्थापित झाल्या असतात आणि जसे अस्तित्वाच्या कार्याला काही अमुक एक कारण नाही, तसेच परिस्थितीत/ दृश्यात बिंदू मिळणे ह्याला काही अर्थ नाही शांत होण्यासाठीचा. कार्य गूढ असते आणि ते जीवाला स्पष्ट होत नाही म्हणून त्यात गुंतायला होते.
आपण भगवंताच्या शक्तीतून झालो आहोत, वावरत राहतो आणि निघूनही जातो. हे पक्के ओळखावे. त्यातून कर्तव्याची व्याख्या स्पष्ट होते आणि तसे व्यवहार आपण हाथी घ्यायला लागतो. माझ्यासाठी काही घडामोडी नाहीत किंव्हा माझ्यासाठी दृश्य जग अजिबात नाही. इथे काहीही सिद्ध करायचे नसते आणि मुद्दामून कशातही गुंतायचे नसते. हेच ओळखायचे असते.
अभ्यासाने सूक्ष्म शक्ती गवसते आणि सत्याचे दर्शन होते.
हरि ओम.
श्री
संगत किंव्हा सवय ह्याचा परिणाम खूप असतो. दृश्य किंवा देहाच्या संगतीमुळे त्या पद्धतीचे अनुभव सतत मनात येत राहतात. तसेच भगवंताच्याही संगतीत स्मरण ठेऊन मन परिवर्तित होऊन भगवत स्वरूप होऊ शकते.
मन अस्तित्वाचे एक रूप आहे, म्हणून मनाची शक्ती कार्य करत राहणार आणि निर्मितीत गुंतत राहणार. हे उघड आहे. आपल्याला असे सांगितले आहे, की आपण बुद्धी वापरून स्वतंत्र विचार करू शकतो. ह्यात दुमत नाही की माणूस विवेकशील प्राणी आहे आणि तो निर्णय घेऊ शकतो. पण बुद्धी तरी दिली कुणी आणि ती देखील निर्माण कशी होते आणि तिचा स्वभाव कसा आणि त्यामुळे कोणता भाव प्रस्थापित होतो? हे महत्वाचे प्रश्न आहेत तात्पुरतेपणात येणारे आणि त्याचा शोध आत्मसात होणे म्हणजे शांत होणे ह्या परिस्थितीत.
मनाने स्वतःचे निर्माण केलेल्या विषयात गुंतण्याची गरज नसते आणि त्यातून स्वतःला लेखण्याची. हे खूप महत्त्वाचे विधान आहे. आपण स्वतःला न्यून समजून घेतो किंवा कमकुवत. हे अतिशय चुकीचे आहे कारण मुळात ह्या संकल्पना द्वैताशी निगडित आहेत, सत्याशी नाही. म्हणजे कुठल्याही विचार धारा किंव्हा भावनांच्या पलीकडे होणे महत्वाचे ठरते, म्हणजेच सूक्ष्म होत राहणे.
त्याचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
श्री
भगवंत जाणिवेचा भाग आहे, तो कुठल्याही स्मरणेच्या घटकेला मर्यादित नसतो किंव्हा अवलंबून नसतो किंव्हा त्यातून पूर्ण अर्थात येत नसतो.
म्हणून हालचाली, बदल, संबंध, भाव - हे भगवंताकडून येत असतात, हे मान्य होऊ देणे. म्हणजे संपूर्ण निर्मिती आणि त्याचे रूप, आकार, परिणाम, स्वभाव - हे भगवंताच्या _असण्यामुळे_ प्रकट होत राहते. त्याला वैयक्तिक हेतू नाही. इथे "नाही" म्हणजे अधिक सूक्ष्म स्तराचे कार्य असणे किंव्हा शुद्ध वस्तू असणे.
आपण स्वतःचे अर्थ लगेच लावण्याचा अट्टाहास धरतो आणि त्यात साहजिकच गुंतून राहतो. वस्तूंचे होणे, येणे, वावरणे, निघून जाणे - हे भगवंताच्या इच्छेमुळे/ स्वभावामुळे/ कार्यामुळे होते - माझ्या म्हणण्याला किंव्हा न म्हणण्याला काहीही सत्य तथ्य नसते. म्हणून उगाचच स्वतःचा अर्थ लावून कष्टी होऊ नये.
म्हणजे मी सूक्ष्म होणे किंव्हा तसे जाणून घेणे महत्वाचे ठरते. मी स्थूलात मर्यादित राहण्याची गरज नाही आणि त्यात आसक्ती बाळगण्याचीही. म्हणून विचार, भावना, देह आणि त्यातून होणाऱ्या हालचालींपेक्षा अधिक सूक्ष्म होता येऊ शकते आणि तशी शक्यता आणि सत्यता उपस्थितही असते अस्तित्वात.
थोडक्यात अस्तित्व हे सूक्ष्म, स्थिर, सत्य अश्या भावात जाणून घ्यायचे असते.
हरि ओम.
श्री
संबंध, तात्पुरतेपण, अर्थ - अश्या गोष्टी विचार मांडते. त्यात अपेक्षा, गुंतणे, कोडी सोडवणे अश्याही गोष्टी सामील असतात. त्यातून भावना होतात, व्याकुळता येते, कष्टी व्हायला होते वगैरे.
कुणीही स्वतःच्या प्रश्नांना शांत करणे अवघड, कारण हा दृश्याचा भागच नाही. असे असताना विचारांची धारा बदलणे महत्त्वाचे ठरते, जेणेकरून समाधान मिळू शकेल आणि आपण उगाचच कष्टी होणार नाही. ते म्हणजे -
कार्य किंव्हा कर्तव्य करावे आणि येणारे फळ शांतीने स्वीकारावे. फळ निर्माण होण्याचे कार्य भगवंत मध्यातून होते, म्हणून ते गूढ असते आणि त्यावर स्वतःची प्रतिक्रिया अवलंबून ठेवण्याची गरज नसते.
इतरांच्या म्हणण्याला विशेष अर्थ नसतो...कारण पूर्ण सत्य कुणालाच माहीत नसते आणि जो तो स्वतःच्या मनाने गोष्टींचा अर्थ लावतो आणि त्यात सिद्ध होण्याचा प्रयत्न करतो. सिद्ध होण्यातूनच खूप कष्टाला सामोरे जाणे भाग पडते. म्हणून शांतीने सर्व ऐकून घ्यावे आणि कर्तव्य करावे. ह्यात मग स्वतःचे आई वडील, बायको, नवरा, नाती, मित्र - मैत्रिणी परिवार आणि इतर लोकं आलीत.
आपल्याला भीती पचवायची असते. ते पचवायला प्रवास असतो, अंतर्मुख होणे येते, शांतीने सर्व सामोरे जायला लागते आणि श्रद्धा वाढवायला लागते. त्यात बुद्धीचा सर्वसामान्य स्वभाव बाजूला सारायला लागतो आणि हे ही ओळखायला लागते की बुद्धी म्हणजे सर्वस्व नाही.
सुख कशातही नसते, बिंदू मध्ये तर नाहीच नाही, म्हणून परिस्थितीत समाधानी व्हायला शिकावे. समाधान म्हणजे कसलाही प्रवाह असला आणि प्रवास घडला, तरीही शांत वाटणे. म्हणजे स्थिर होण्याचा प्रयत्न करावे.
आपण कशाने स्वतःला लेखू नये. जे होते, जे येते, जे जाते - ते योग्यच असते आणि हिताचे असते.
हरि ओम.
Shree
Time is of essence.
There are things that arrive and need to be seen, engaged, given and so on. Hastening this is not the answer to become steady or fearless.
By exchanging things through technology, such as AI or emails or other desk centric tools, i don't think fear can get effectively addressed or calmned.
The ingredient to face the fear is to discuss and collaborate, according to me and allowing things to become regardless of our own perception of reality.
Because things change, there is always a connection and a distance among everything. This _distancing_ is crucial to realise the truth eventually. This _distancing_ is God's way of suggesting to us that truth is yet to be discovered.
Distancing happens through inner states, outer expressions, many processes, many forms, movements, changes and so on. Actions appear different in different situations and hence we needn't pass judgements on anything.
By this, one realizes that patience and forgiveness are keys to lasting faith. Anything can happen here, and anything can be allowed to happen.
Hari Om.
Shree
We see things as compartments and identify ourselves with that limitation. Whatever takes up a form has limitations expressed as space, time, process.
It seems as a behaviour, that anything that happens "beyond" a compartment or a limitation, is not of any concern or of any value to us.
In our daily existence, this means that certain forces exist beyond our logical comprehension and _those_ inform our perception. We don't know this connection but that is precisely the point - we needn't know it logically. And logic has limitations, boundaries, constructs etc. There is an attitude of engagement because of logic and that gets limiting.
Therefore there arise questions concerning this limitation, attitudes, going beyond, processes and so on. Going beyond is realization. How it happens is mysterious and there are only some paths _indicated_ or suggested. Venturing on those paths reveals subtle states, which create further questions. By continuing to go on this path, one finally _arrives_ home.
Hari Om.
श्री
कार्य आणि त्यातून होणारे संबंध किंव्हा परिणाम गूढ असतात. त्यातून शेवटी बदल, हालचाली जाणवतात, स्मरण होते, विचार आणि भावना होतात, परिस्थितीचे अर्थ लावले जातात, त्यात गुंतायला होते आणि भोग येतात. हे विधिलिखित आहे.
तसेच त्यातून प्रश्न निर्माण होऊन, मार्ग पत्करून शांतीचा प्रवास घेणे - हे ही विधिलिखित आहे...म्हणून आज किंव्हा उद्या आपण तो मार्ग घेणार. ह्याचा अर्थ कधी ना कधीतरी गुंतून राहण्याची मर्यादा जाणवेल आणि त्यातून सत्याचा शोध पत्करायला लागेल.
संबंध गूढ असतात...म्हणजे प्रत्येक घटकाच्या स्वभावातून संबंधांचे रूप किंव्हा मुल्य प्रकट होते. उदाहरण बुद्धी बघा. जर, तर, बिंदू, विघटन, चिकित्सा, विषय, कोडी - हा बुद्धीचा स्वभाव धर्म झाला. म्हणून त्यात ते गुंतत राहते आणि अपेक्षा ठेवते की त्या पद्धतीने विषय सुटावेत.
म्हणून अस्तित्व कार्य शुद्ध आणि सूक्ष्म रूपात जाणून घ्यावे. त्यातून खरी शांती लाभते. उत्तरे का कळत नाही त्वरित - ह्याचे बीज बुद्धीच्या स्वभावात आहे. वस्तू किंवा फळ होण्याचे कार्य भगवंताचे मध्यम करते, म्हणून आपण कर्तव्य करून सारे फळे स्वीकारावे. अस्तित्वाचे कार्य आणि त्यातील सर्व प्रकाराचे घडामोडी भगवंताची शक्ती कारण ठरते. म्हणून जे होते, ते योग्यच असते.
असा सैय्यम आणि श्रद्धा होण्याला अभ्यास लागतो. तो अभ्यास करावा.
हरि ओम.
श्री
दृश्यात, स्थळाच्या आणि काळाच्या रुपात वावरत असताना, ज्या प्रकारे संबंध प्रस्थापित होतात, त्यात भगवंताचे चिंतन सदैव उत्तेजीत ठेवावे. भगवंताची आठवण किंव्हा स्मरण प्रत्येक क्षणात वर्धमान असायला हवी, कारण सर्व प्रवाह आणि प्रवास त्याच्या कृपेने घडत असतो.
अशी जाणीव येण्यासाठी श्रद्धा, सैय्यम, प्रयत्न, कर्तव्य अश्या गोष्टी निर्माण होण्याची गरज असते. किंबहुना भगवंताचे चिंतन अखंड झाले, की ह्या शुद्ध भावना प्रस्थापित होतात. थोडक्यात शुद्ध होण्यात आणि विचार आणि भावनेत संबंध असतो. भगवंताला मी शुद्ध भावना, ह्या पद्धतीनेही ओळखू शकतो किंव्हा त्याला आपलासा करू शकतो.
म्हणून आतील सर्व घटक भगवंताशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि अभ्यासाने ते सूक्ष्म जसे होतात, तसा भगवंत भाव प्रस्थापित होतो.
अर्पण झाल्याशिवाय, शांती भाव प्रस्थापित होणे अवघड. रुपामुळे व्याकुळ होण्याची गरज नाही. सर्व भगवंत करतो, म्हणून कशीही परिस्थिती मनाने रचली किंव्हा ध्यानात संबंधित आली, तरीही मूळ भगवंताचे कार्य आहे, हे स्वीकारावे आणि त्या होण्याला संपूर्ण शांतीने शरण जावे.
हरि ओम.
श्री
आतील घटकांचे होणे येत असते आणि त्यावरून बहुतांश गुंतायला होते, भाव होतो, प्रतिक्रिया दिली जाते, परिणाम होतो, चक्रात वावरतो वगैरे.
हे गुण येत राहणे - प्रवाह - ते शक्तीचे कार्य म्हणून ओळखावे, म्हणून त्याचे परिणाम होणार आणि त्यांना सामोरे जाणे येणार. अजिबात घाबरू नये.
कुणी का आणि कसे व्यवहारात गुंतून राहते आणि कुठल्या प्रवासात असते, ही भगवंताची इच्छा म्हणून मानणे. आपण अस्तित्वात असतो, हे पक्के आहे. त्या भावनेला आत्मसात करून घ्यावे, म्हणजे हेतू सूक्ष्म होतो आणि विशाल होतो.
योग्य परिणाम होतो, त्यावर श्रद्धा ठेवावी आणि खूप सैय्यम ठेवावा. भगवंताची कृपा होईल. जे येते, ते स्वीकारावे शांतीने, त्याची इच्छा ओळखून.
हरि ओम.
श्री
मी inferiority complex ह्या भावनेत गुंतायचो आणि तसे संबंध प्रस्थापित ठेवायचो.
त्याचे उत्तर बौद्धिक नाही असे वाटते. म्हणजे "नाही" ह्याचा अर्थ की प्रवास असणार आहे, परिणाम असणार आहे, मार्ग शोधावा लागणार आहे आणि शांत होण्याचा अभ्यास करावा लागणार आहे.
आपण स्वतःच्या संबंधांना खूप घट्ट धरून ठेवतो आणि त्यामुळे कष्टी होतो, व्याकुळ होतो.
मला वाटते की स्वतःला पूर्ण स्वीकारावे आणि माफ करावे की पूर्ण सत्य माहित नसते आणि म्हणून एक प्रवास ध्यानी होतो. मी जसा आहे, तो भगवंताने निर्माण केला आहे, म्हणून कुणाला खुश ठेवण्यात मी सर्वस्वी बांधील नाही. मी कर्तव्य करतो आणि तेवढेच हातात असते. फळ भगवंत देतो. माझे कर्तव्य भगवंताशी आहे, तसे होणार.
हरि ओम.
