श्री
श्री
बदल...हा भाव असतो अनुभवात निर्माण होणारा...जो प्रकट होतो, साखळी दर्शवतो, संबंध जोडतो, परिवर्तित
होतो, चक्रात राहतो.
ह्या भावनेला शांतपणे स्वीकारावे. म्हणजेच की ह्या हालचालींचे बीज कुठे असते
आणि कसे कार्य करते, हे स्वीकारावे शांतीने.
त्या सूक्ष्म हालचालींचे बीज मोठे झाल्यावर "प्रपंच" नावाचे झाड
होते ज्याचे फळे स्वतःला पचनी करायला लागतात. थोडक्यात जसे बीज, तसे झाड, तशी फळे, तसा परिणाम.
सांगण्याचे तात्पर्य एवढेच की बदल हा गूढ भाव अस्तित्वाच्या कार्यात आढळून
येतो. तो का असतो माहीत नाही मला. तो स्वीकारणे एवढेच आपल्या हातात असते. _माहीत नसल्या गोष्टी तरीही गोष्टींचा स्वभाव संपूर्ण स्वीकारण्याची ताकद
आपल्यात असते_. ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे असे मला
वाटते विचार करत असताना. आपण इथे कसे आलो, का आलो, कुठे जाणार, का जाणार, कसे
जाणार, संबंध कसे होतात, नाती का होतात,
ह्याचे उत्तरे मिळाले नसले तरीही माणूस समाधानी राहू शकतो. हे शक्य
आहे. विचार करावे, पण मनाची वळवळ करून घेण्याची गरज नाही.
विचार कुतुहलपोटी करावे, त्यातून सिद्ध होण्याची भावना प्रकट
होऊ देऊ नये...त्या भावनेशी संपर्कात असू नये.
इथे असे जाणवते की विचार शक्ती ही भावना ही प्रकट करते आणि प्रज्वलित ठेवते.
विचारातून भावना चक्र आणि भावनेतून विचार चक्र असा संबंध असतो. पाहिले कोण आणि
नंतर कोण अशा कोड्यात पडण्याची जरुरी नाही. त्यात आपण पडतो कारण अशी अपेक्षा असते
की मूळ कळले, तर त्यातून सर्व गोष्टींचा ताबा मिळवणे सोपे जाईल. ही अपेक्षा
चुकीची असते असे म्हणत नाही मी, पण ती सदोष असते, त्या अपेक्षेला मर्यादा येते.
समजून घेण्यापुरती सूक्ष्म काय आणि स्थूल काय असे विश्लेषण असते. पण ती रेघ
नाही हुकूम सोडवण्यासाठी. तिला संपूर्ण स्वीकारून मार्ग पत्करला जातो. ह्यातून
शांती भाव संक्रांत होऊ पाहते.
मनुष्याने प्रगतीचा अर्थ म्हणजे वासनेवर ताबा मिळवणे असा केला आहे. त्यातून
भली मोठी भीती भावना निर्माण होते. विघटित झाल्यामुळे, खूप वेगात गेल्या मुळे आणि एकलकोंडी झाल्यामुळे, जे
निर्माण झालेले दिसते, ते म्हणजे exploitation of
every moment to an unimaginable extreme level. कितीही केले तरी
पूर्ण समाधान मिळणार नाही, जो पर्यंत आपण संपूर्ण स्वतःला
भगवंताला शरण जाणार नाही.
भगवंत गूढ आहे आणि तो रूप, आकार, संबंध ह्या सर्व हालचालींच्या
पलीकडे त्याचे कार्य असते. कार्याचा निश्चित परिणाम प्रपंचात होतो. तो आपल्याला
दिसत नाही, म्हणून आपण चिंतेत राहतो. भगवंत आहे, तर हालचाली होणारच आणि वाट्याला प्रपंच तो येणारच आणि त्यातील सर्व प्रश्न
ओघाने निर्माण होणारच आणि त्यातून शोध आणि पुढे मार्ग आणि शेवटी शांती भाव असे
संक्रांत होणारच. ह्या सर्व गोष्टीला "अंतर्मुख होणे" असे म्हणतात.
हरि ओम.
श्री
अनुभव प्रत्येकाचा निराळा असतो. भगवंत त्यातून शोधायचा असतो. पूर्वी ह्या
पद्धतीने भगवंत किंव्हा कुठलीही शुद्ध संकल्पना कळली, तरीही आता तशीच कळून घ्यायला हवी, हे कितपत योग्य
असते? संकल्पना हा संबंध दर्शवतो. आपल्या मनोरचने प्रमाणे
त्याच्या संबंधात आपण येतो, त्याला विषय करतो, व्यवहारात लागू करतो आणि साहजिकच परिणाम भोगतो. म्हणजे कुठलीही संकल्पना
तसे सत्याचे दर्शन त्वरित करून देऊ शकत नाही.
संकल्पना सत्याची स्वतः मध्ये शोधायला लागते आणि त्यातून मार्ग प्रत्येकाचा
ठरतो. तो सांगणे अवघड, फार तर फार लवचिक आराखडा किंव्हा विश्लेषण करून सांगू शकू
आपण. खरे पहिले तर जीवन तसेच समजून घ्यायला लागते आणि इतरांना तसेच अनुभव मांडून
द्यायला लागतात - विश्लेषण रूपातून. It isn't prescriptive. It is
symbolic.
त्या अर्थाने आयुष्य विश्लेषण रूपाचे कोड आहे. म्हणजे कोडी त्रास देणार नाहीत
विशेष. आपले येणे, वावरणे, विलीन होणे - हे सर्व विश्लेषण
आहे. म्हणजे कार्य आहे. कार्याचा परिणाम म्हणजे दृश्याचे स्थान.
हरि ओम.
श्री
बुद्धी जर - तर च्या भाषेत प्रस्थापित असते. म्हणजे साखळीचे स्वरूप काय, उगम कसा होतो, मार्ग कोणता, परिणाम
कसा होईल वगैरे हे बुद्धीचे मुख्य प्रश्न.
अध्यात्म मध्ये ह्याची जरूरी असते, पण त्याच्या व्यतिरिक्त श्रद्धा भाव
वाढवण्याचीही असते. म्हणजे साखळी जरी कळली नाही, तरी
अस्तित्व शक्तीचे कार्य स्वीकारू शकतो आपण. म्हणजे सूक्ष्म स्थिती आणि शांती भाव
आणि आपुलकी प्रस्थापित होऊ शकते. त्यासाठी एखादा _मार्ग_
पत्करायचा असतो.
अर्थातच सर्व सत्य आत्ताच्या स्थितीत स्पष्ट होणे कठीण. मग आपल्याकडे दोन
पर्याय असतात ह्याचे - कळले नाही तर "भीती" निर्माण करावी, ताबा मिळवावे, विषय करावे, ओरबाडून
घेणे हे सर्व करावे की श्रद्धा वाढवून न कळण्याचे
स्वीकार करावे (कारण कळणे किंवा न कळणे हे अस्तित्वात घडते/ त्याने अस्तित्व
माध्यम ठरत नाही वगैरे), सूक्ष्म माध्यम कार्याचे स्थान
स्वीकारणे आणि आपल्या हातात प्रयत्न, सैय्यम, श्रद्धा अशा गोष्टी वाढवत राहणे. थोडक्यात दृश्याचा अनुभव जरी येत असला
तरी त्याच्याही पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणे.
हरि ओम.
श्री
आपण ह्या पद्धतीनेही प्रकार काय होतो हे समजून घेऊया...
शांती एकच सूक्ष्म, कायम आणि सत्य माध्यम अस्तित्वात असते. त्यात विघटन होऊन,
क्रिया होऊन, स्पंदनेतून वासना, विचार, भावना चक्र निर्माण होते आणि त्याचा परिणाम
म्हणजे वेगळे स्मरण आणि द्वैत अनुभव त्या जीवाच्या (आपल्या) ध्यानी येतो. म्हणजे
चौकट, मर्यादा अशी निर्माण होते स्वतःच्या भोवती आणि त्यात
आपण गुंतून राहतो.
सर्वांगीण विचार किंव्हा जाणीव असणे आणि फक्त वैयक्तिक जाणीव होणे ह्यात
अवतरणे, विघटन, तात्पुरतेपण, स्वार्थ, अहं वृत्ती अशा गोष्टींचे फरक होते ह्या
दोन स्थितीत. म्हणून वैयक्तिक होणे स्वतःलाच जास्त त्रास देते, भीती निर्माण करते, कष्ट देते, जास्त मर्यादित किंव्हा तात्पुरते बनवते आणि तसेच विचार चक्र आणि भावना
चक्र प्रज्वलित ठेवते.
अध्यात्माच्या पातळीवर, असे सांगतात की जीव इतका मर्यादित होतो, की विचार, भावना, देह ह्या
वासनेमुळे तो कष्टी होतो. प्रारब्ध. त्याला दृश्याचे व्यसन लागते आणि कितीही सत्य
त्याला सांगितले, तरीही त्याला पटत नाही , त्याला भीती वाटते आणि त्यापासून तो दूर जातो आणि खूप बडबड करून स्वतःचे
समर्थन करतो. म्हणून सत्य सांगणे हा मुद्दा नाही. त्याचा योग्य परिणाम इतरांवर
होईल का, हा आहे. त्यासाठी आपण कार्य करावे, प्रयत्न करावे आणि शांतीने सोडून द्यावे.
तसंच , जाणीव जर सूक्ष्म झाल्या असतील, तर त्या
सूक्ष्मपणांचे स्पंदने इतरां पर्यंत सांगणे कठीण. म्हणजे दृश्यात व्यवहार करताना,
सैय्यम ठेवायला लागतो आणि आपण शांत राहायला लागते. त्या पद्धतीने
शांत असण्याचा आणि दृश्यात व्यवहार करण्याचा संबंध सरळ नाही, गूढ आहे आणि हे गुढत्व देखील सांगणे कठीण. जर ते कविता सारखे किंव्हा
विश्लेषण पद्धतीने सांगितले तर ठीक असते. थोडक्यात सर्व लवचिक आणि विश्लेषण
पद्धतीने समजून घ्यावे, ऐकून घ्यावे, समजून
देणे.
विश्लेषण मध्ये प्रयत्न आणि सैय्यम आणि श्रद्धा आपली, परिणाम किंव्हा फळ भगवंताचे जे आपण शांतीने स्वीकारू. Because the
connection or relationship of a cause with an effect is mysterious beyond any
plain logic. Here "logic" is not math or the intellect, but a way of
sequencing or relating things based on inner wisdom. More subtle is the state
of mind, more profound is the logic of awareness of things. Logic after all, is
a relationship of all things in different states of being.
हरि ओम.
श्री
वरील लेखाचे बरेच अर्थ निघून येतात दृश्यात वावरताना...
गोष्टींचा हेतू काय असतो आणि कुठले हेतू ठेवून त्या केल्या जातात हे ओळखावे.
जर अहं भाव असेल, ह्याचा अर्थ आपण कोषात आहोत. जर अहं भाव नसेल, त्याचा अर्थ की सर्वांगीण विचार मनात येऊ घातले आहेत.
मनाच्या स्वभावामुळे आपण गोष्टींचे "अर्थ" लावतो. मुद्दामून त्रास
होण्यासाठी जर गोष्टी वाट्याला येत असतील (असा समज करून घेतला असेल), तर आपण संकुचित आहोत. जर असे खरे वाटत असले की सर्व गोष्टी भगवंतामुळे,
त्याच्या इच्छेमुळे आपल्या ध्यानी येत असतात, तर
समजून घ्यावे की मन शांत झालं आहे. म्हणून अर्थाने भाव शांत किंव्हा अशांत ठरतो,
त्या गोष्टीमुळे नाही. ह्याचा अर्थ हा की नातींचे स्वरूप, कामाचे स्वरूप, जीवनाचे स्वरूप कसेही जरी आले
किंव्हा बदलत गेले, तरीही त्याच्या पाठीमागचा अर्थ असा आपण
जाणिवेत आणू शकतो, की त्यातून शांती रस लाभू शकेल.
देहबुद्धिशी संबंधित विचार आणले, तर खूप तात्पुरतेपण आणि भीती भावना
निर्माण होईल. आत्मबुद्धीशी निगडित विचार ध्यानी आणले, तर
शांती भाव संक्रांत होऊ शकेल.
सत्याचे कार्य निश्चित असते. पण ते आपल्या मर्यादेच्या भूमिकेतून जाणिवेत
आणायला लागते...इथे प्रयत्न, सैय्यम आणि परीवर्तन होण्याचा इशारा आहे.
जेवढी मर्यादा जास्त, तितके अनेक विषय, अनेक कोडे, अनेक प्रकारचे गुंतून राहणे दृश्यात, अनेक धावपळी,
अनेक अपेक्षा, स्थळ आणि काळाची भीती वगैरे.
जेवढी जाणीव विशाल, तितक्या कमी धावपळी, कमी कोडी, कमी अट्टाहास, कमी अपेक्षा,
जास्ती तृप्तता, जास्त स्वीकार होण्याकडे
प्रवृत्ती, जास्ती आपुलकी वगैरे.
जेवढी जास्त मर्यादा, तेवढा बहिर्मुखपणा जास्ती, तेवढे
इतरांमध्ये दोष शोधण्याचा अट्टाहास आणि इतरांना नावे ठेवण्याकडे कल. जेवढी विशाल
मनोरचना, तितके अंतर्मुख होण्याकडे कल, अट्टाहास कमी, स्वतःचा दोष काढण्याकडे कल, इतरांचा स्वच्छ भावनेने स्वीकार वगैरे.
तात्पर्य - आतील वृत्ती हा विषय समजू नये. सर्व स्थिती, स्तर, संबंध भगवंताने दिले आहे, हे ओळखणे.
हरि ओम.
श्री
काही विचार....
क्रियेतून किंवा त्वरित करून किंव्हा प्रश्न विचारून सिद्यत्व होते का? जर मूळ सवाल काय आहे हे ओळखता आले, तर सर्व कार्य
म्हणू शकू आपण. त्या कार्यात आपण होणे, शोध, प्रश्न - सर्व काही येते.
सारे गोष्टीना प्रवाह, परिवर्तन, अमर्याद, शांती भाव असे स्वरूपात बघणे शक्य असते. गोष्टी म्हणून त्या अर्थाने खऱ्या
किंव्हा जीवाशी संबंधित नसतात, ते भगवंताच्या कार्यातून येत
राहतात. गोष्टींच्या प्रवाहात मी आणि भगवत भाव ह्याचे मिश्रण असते.
ह्याने असेही कळून येते, की मन काहीही निर्माण करू शकते. निर्मिती मध्ये प्रतिभा,
प्रक्रिया, स्मरण, भाव,
साखळी, गुंतून राहणे हे सर्व काही आले.
स्वतःला निर्मिती पेक्षा वेगळ बघायला हवे. म्हणजे निर्मितीतून मी ठरत नसतो. _मी_ ही संकल्पना असते, जी होते
आणि बदलत राहते.
भगवंताच्या इच्छेपोटी, तो स्वतः द्वैत दृश्यात येतो, विघटित
होतो, सर्वां मध्ये येतो आणि आपल्या रूपात मिसळतो. म्हणजे
त्याला दृश्याचा अनुभव घ्यायचा असतो आणि म्हणून तसे अनुभव निर्माण करतो, त्याच्या लीला मधून. संसाराला त्या पद्धतीने किंव्हा त्या भावनेने ओळखावे.
आपल्या कार्याला अमर्याद, निरहेतू, स्वच्छ रंग असावा. प्रत्येक
क्षण कार्य आहे. त्यातील येणारे विचार, भावना, क्रिया, वस्तू, नाती, विषय - सर्वांना अमर्यादित भूमिकेतून बघावे, देहाच्या
आणि रूपाच्याही पलीकडे जाऊन ओळखावे.
Transcendence is a flow. It is not a proof or a stop point.
हरि ओम.
श्री
काही विचार...
सर्व बदल, स्थळ, काळ, परिस्थिती
अनुभवणे. ते थांबवण्याची गरज नाही आणि तिथे गुंतून राहण्याची गरज नाही. प्रत्येक
क्षणात, स्थळात, काळात काहीतरी करायलाच
हवे, असे नसते. नुसते ध्यान, चिंतन,
स्वस्थ बसून राहिले, तरीही खूप फरक होतो
अस्तित्वात, जो जीवातून सर्वांगीण दिशा पसरलेला असतो. That
is, I am not bound to anything or by anything. I am beyond all constructs,
beyond all barriers, all spaces, all times, all actions, all connections. None
of these define me or I identify particularly with none. थोडक्यात,
मर्यादित हेतूच्या पलीकडे भाव स्थिर असणे.
स्वस्थता ह्या विचारातून किंव्हा जाणिवेतून येते. मला काहीही माहित नाही, आणि त्यात समाधान आहे. मनाच्या व्यतिरिक्त कार्य असते, हे असण्यात आणि ओळखण्यात आणि स्वीकारण्यात समाधान असते.
आपण परिस्थितीला पुरून उरत नाही. कोण काय म्हणते आहे, कधी, का, कुठल्या हेतूने,
हे माहित नसले तरी आपली शांती त्यावर निर्भर नसते. शांती कशावरही
निर्भर नाही. मी विलीन होऊन शांती लाभते. म्हणून विलीन होण्याच्या मार्गात आलेल्या
अवस्था ह्यांना शांतीने सामोरे जाणे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home