श्री
श्री
साखळी जरी माहीत झाली, तरी तो संबंध (किंव्हा कुठलाही संबंध, त्याचे रूप, परिणाम, स्थळ, आकार, बदल, चक्र, भाव) भगवंताच्या इच्छेने झाला असतो. म्हणून बुद्धीने जरी सर्व मांडता आले, तरीही आपुलकी श्रद्धेच्या भावनाने प्रकट करायला लागते.
श्रद्धा म्हणजे भगवंताच्या शक्तीवर पूर्ण विश्वास, त्या गूढ प्रक्रियेवर विश्वास, पूर्ण स्वीकार, स्थिरावणे, सूक्ष्म होणे, विशाल होणे, पलीकडे होणे, शुद्ध जाणीव होणे.
झाडाला पाणी दिले की ते वाढते. भगवंताचे नामस्मरण केले की जाणीव शुद्ध होईल, त्यात दुमत नाही. आपण परावलंबनाच्या प्रकारांवर चिकित्सा करू शकतो, किंबहुना ते होणे आहे. त्यातून जाणीव शुद्ध होण्याचीही शक्यता आहे. विचार जरी केला, तरी शांती भाव प्रकट होऊ देणे, म्हणजे हे सतत ठरवायला लागते की बुद्धीची मर्यादा काय, हेतू काय आणि श्रद्धेवर काय सोपवावे.
थोडक्यात अस्तित्व शक्ती स्वतःचा विचार करते.
हरि ओम.
श्री
मूळ प्रश्न जर बघितला तर तो असा असावा की अस्तित्व भाव काय आहे, ते काय करतं आणि त्यातून परिणाम कसे होतात? मग त्यातून स्मरण, अनेक स्तर, घटक, साखळी, बदल, संबंध, रूप, आकार, जाणीव - ह्या काही संकल्पना त्यातून निघून येतात. त्यात अंतर्मुख अनुभव आणि बहिर्मुख अनुभव हे उद्भवते. दोघांचा स्वभाव वेगळा असल्यामुळे, त्यातून होणारे कार्य आणि परिणाम वेगळे असतात.
इथे कुठेतरी मनाच्या शक्तीची व्याख्या दडलेली दिसते आणि मन काहीतरी धारण करत राहते, असे दिसून येते. Imagination. मन कधीही मोकळे राहणार नाही, म्हणून अस्तित्वाच्या नियमानुसार कुठल्यातरी कार्यात मन गुंतून राहत. कशात ते गुंतून राहत, त्यावरून संस्कार ठरतात, परिणाम ठरतात, स्मरण ठरतं आणि विचार आणि भावना.
सांगण्याचे प्रयोजन एवढेच की ह्यावरून एकत्रित होणारी जाणीव आणि विघटित होणारी जाणीव हे मुख्यतः अस्तित्वात वावरण्याचा स्थिती आढळतात. दोघांचा परिणाम विलक्षण होतो स्वतःवर. त्यावरून कुठला परिणाम योग्य म्हणावे, हे ओळखावे.
तात्पुरतेपण, वेगळेपण आणि त्यातून होणारा त्रास, चिंता, काळजी, राग, लोभ, अट्टाहास, हे सर्व विघटित क्रियेचे लक्षण आहे. त्याच भाषेत कोडे सोडवणे महा कठीण, कारण ते तात्पुरतेच राहणार असते.
त्या भाषेच्या *पलीकडे* कार्य करणे आणि एकत्रित शांत सत्य प्रकट होणे, हा योग्य मार्ग समजावा. पलीकडे जाण्यास/ होण्यास स्वतःला थांबवू नये. योग्य परिवर्तन म्हणजे पलीकडचे सत्य जाणिवेत येणे.
आजच्या परिस्थितीत काय दिसून येते की विघटित क्रिया आणि त्यामुळे होणारा विलक्षण वेग, बदल, हे सामोरे येते. ह्या चक्राच्या पलीकडे कसे होता येईल?
त्यासाठी नामाचा नेम धरावा. तो योग्य मार्ग सुचवेल. मार्ग सोपा नसावा, पण योग्य असावा. शांती भाव सुलभ कधीच नसतो. तिला प्रयास, सैय्यम, श्रद्धा असे घटक लागतात आणि भगवंताची कृपा.
बदलांवर, परिस्थितीवर, वस्तूवर, व्यक्तीवर रागावून मनस्ताप आपलाच होतो. शांतीने सर्व करावे. ते आपले ध्येय मानावे.
हरि ओम.
ReplyForward |
0 Comments:
Post a Comment
<< Home