Saturday, June 13, 2026

श्री

 श्री 


रूप, आकाराला स्मरण असते, जे खूप सूक्ष्म स्तरातून हालचाली निर्माण होत स्थुलात _प्रकट_ होते आणि त्या स्थूल स्थितीचे व्यवहार इतरांशी/ द्वैताशी/ दृश्याशी प्रस्थापित करते. कार्याचा परिणाम म्हणजे द्वैताची निर्मिती आणि त्यातून होणाऱ्या स्थूल किंव्हा वेगळेपणाने जाणवणाऱ्या _हालचाली_ स्थळात किंव्हा काळात किंव्हा कृतीत किंव्हा स्वतःतच. दुसऱ्या अर्थाने हालचाली म्हणजे सबंध/ व्यवहार जे खूप आतून प्रस्थापित होत राहतात, म्हणून त्याचे पाया मुळे सापडणे अवघड जाते बुद्धीला. 

जे काही विचार आणि भावना उद्भवतात, हे ह्या स्थितीत साजेसे असे उद्भवत राहतात. विचार आणि भावना सूक्ष्म झाले, तर स्थितीही सूक्ष्म जाणवते आणि संबंधांचे रूपही त्यानुसार होते. म्हणजे हे सर्व प्रकरण गुंतले गेलेले आहे. 

म्हणून असा अभ्यास स्थित होतो की मनाला शांत कसे करावे आणि त्यातील हा प्रश्न पहिले की मन म्हणजे काय? ह्या प्रश्नाला तीन भाग आहेत. हा प्रश्न बुद्धीतून समजून घ्यायला लागतो आणि प्रत्यक्षात नामाचा आधार घ्यायला लागतो. आणि तिसरं म्हणजे "मी" ह्या संकल्पनेचा संबंध वरील अभ्यासात काय असतो? 

मला काहीही माहित नाही (गृहीत धरू नये कशाला) हे जाणवायला हवे. मी कशावरही निर्भर असत नाही, सत्य जर पाहिले. स्थळाची आणि काळाची परिस्थिती कशीही जरी प्रस्थापित होत राहिली, तरीही त्याने आपण काही सिद्ध करण्याची गरज नसते. आतील शांतता आणि सिद्ध होत राहण्याची प्रक्रिया - ह्यात काहीही संबंध नसतो/ तसा तो जोडण्याचीही गरज नाही. प्रारब्ध असतात आणि ते स्वीकारावे लागतात शांतीने. प्रत्येकाला प्रवास असतो. तो श्रद्धेने हाथी घ्यावा.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home