श्री
श्री
मनाचा स्वभाव गूढ असतो आणि कुठेतरी सतत गुंतून राहण्याचा भाग दर्शवतो. त्यातून होणारे स्मरण, कृती, हेतू, बदल, भावना, वगैरे.
_प्रस्थापित होणे_ हा अस्तित्वाचा गुण आहे म्हणून सत्य ओळखायला दर क्षणी मार्गावर जायला लागतं जीवाला अनुभव ध्यानात येत राहताना.
गोष्टी येतील, जातील, वावरतील, सुटतील आणि खूप कष्ट मनात निर्माण करत राहतील.जो काही बदल होईल, त्यातून स्वतःची व्याख्या ठरवू नये, स्वतःला लेखू नये, न्यूनपणा वाटून घेऊ नये.
परिस्थितीची स्थापना भगवंत करतो आणि तोच तारून नेतो. म्हणून तसे घडत राहताना आपण श्रद्धा आत्मसात होऊ द्यावी आणि शांती वाढवावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home