Tuesday, October 08, 2024

श्री

 श्री 


वरील क्षण संबंधित खूप विचार मांडता येऊ शकतात. ती एक धारा होऊ शकते. Unfold.

जिवंतपणा, स्मरण, कार्य, हेतू, परिणाम, अनुभव, अकरांच स्वरूप - हे क्षणावर आधारित आहे. अहं म्हणजे त्याला "मी" - "संकुचित क्षण" म्हणू शकतो. ह्याच्या उलट भगवंत हा क्षण दर्शवत नाही, प्रवाहच्याही पलीकडे "होतो". I am an existential state or a certain form of space and time. So the "form" suggests the _nature_ of perception of existence. 

बदल काही वेगळे गोष्टी दर्शवत नाही. ते वाटतात तशे आणि त्यातून सुख किंव्हा दुःख करून घेतो आपण, ह्याचा अर्थ की क्षणाची व्याख्या खूप मर्यादित केली गेली आहे. ढग, गती, गुण हे आकार कायम नाही. ते बदलत राहतात, ह्याचा अर्थ की स्तरांच्या जाणिवेतून ते निर्माण झालेले " भासतात ". वृत्ती क्षण निर्माण करते. वृत्ती काळ आणि स्थळ निर्माण करते. तर निर्मिती ह्या क्रियेमध्ये जाणीव अनेक प्रकारच्या स्थितीतून जाऊन एक अनुभव "दाखवते". ते अनुभव त्यांनाच कळतात ज्यांच मन देखील त्या स्थितीत वावरत. तर क्षणाचे पडसाद अनेक प्रकारचे आकार, स्थिती, स्तर, आत - बाहेर क्रिया दर्शवतात किंव्हा निर्माण करतात. मग आपण आकार त्या पार्श्वभूमीवर निर्माण करतो आणि त्या संबंधित राहतो आणि त्याच्याशी त्या पद्धतीने व्यवहार करतो. मग निर्माण झाले प्रश्न आणि त्याचे उत्तरं...ही साखळी कायम राहिली. प्रश्न का पडावे, हे ही गूढ प्रकरण आहे. कारण आपण समाधानी होत नाही सध्या, म्हणून प्रश्न आहेत. कितीही दिलं, केलं, तरी सत्याचा अंदाज नसेल तर ते कृत्य कष्टाला कारणीभूत होतात. 

क्षणापासून आपण अर्थ खूप तात्पुरते लावतो. एखादी गोष्ट का घडते, कशी येते आणि जाते आणि आपण का गुंतून राहतो हा सर्व क्षणाचा खेळ आहे. कुठल्याही संकल्पनेला " बिंदू " म्हणून बघणे हे ही घातक आहे आपल्यासाठी. मुद्दामून जोडणे, पळणे, बळजब्री करून थांबवणे हे ही त्या बिंदुचे उपक्रम आहेत. बिंदूला दोष देणे, आपल्याला दोष देणे, न्युन बाळगणे किंव्हा अती अहांकरिक होणे, हे सारे त्याच स्थितीचे पिलावळ आहेत. 

अट्टाहासाने कोड सोडवणे किंव्हा उतावळे होणे किंव्हा अर्धवट वाटणे हे देखील मर्यादित जाणीव दर्शवते. असे का आहे, हा प्रश्न देखील त्या स्थितीचा आहे.

वरील सर्व गोष्टी बघता, प्रवाह जाणण्यासाठी श्रद्धा वाढवणे हाच मार्ग आहे.

मी आज आलो नाही, आणि उद्याही जाणार नाही. मला मरण नाही, जो स्थिर आहे. जे मरत, झिजत, परिणामी राहत, अवलंबून असतं, तो _क्षण_ असतो. 

परदेशी अशे बरेच किस्से आहेत की भारताची आठवण तेव्हा येते जेव्हा भारतातली कुठलीही माणसं त्यांना भेटतात. हा काय प्रकार आहे स्मरणांचा?!! म्हणजे आपण स्मरणात वावरतो. एखादी गोष्ट मला खूप गूढ आणि आपुलकीची स्मरण निर्माण करू शकते. तिथे ती गोष्ट महत्वाची नाही, पण जे स्मरण पावते त्या प्रमाणे आपण भावना निर्माण करतो. 

असे जर आहे, तर आपण झाडे, पक्षी, डोंगर, पाणी, सूर्य, पाऊस, माणूस, मांजर, कसे बघतो?! कुठल्या भावना उफाळून येतात??...असे आहे, की " पूर्वी " आपण पर्यावरण ला एक गूढ शक्ती आणि त्यात आपले स्थान ह्या पद्धतीने जाणून घेत असे. आत्ता कुठल्या भूमिकेतून पर्यावरणकडे बघतो? शक्ती किंव्हा देवाची तरी आठवण येते तरी का? खुद भगवंत आत आणि बाहेर उभा राहून सुद्धा आपण त्याला ओळखत नाही आणि हेच विश्व आपल्याला स्थूल किंव्हा जड वाटते. अशी आपली गत.

0 Comments:

Post a Comment

<< Home