श्री
श्री
आपण कुठलाही निर्णय घेतला, निश्चय केला, कार्य केलं, परिस्थिती झाली, परिणाम अनुभवले, तरीही भगवंताची इच्छा प्रत्यक्ष येत असते हे ओळखावे. त्याची इच्छा कळायला आपलं मन सूक्ष्म व्हायला लागतं, म्हणून सध्या श्रद्धा वाढवण्याचा निर्णय घ्यावा. श्रद्धेने आपण अनुभव स्वीकारू आणि कशालाही दोष नाही देणार, किंव्हा न्यूनता नाही बाळगणार किंव्हा परिस्थितीवर आपले स्वतःचे अपेक्षा नाही लादणार आणि परिस्थितीवरून स्वतःची संकल्पना तैय्यार नाही करणार. मुळात स्व - ही भावना मंदावेल. भगवंत जे करेल, आपल्याही आकलनाच्या पलीकडे, ते योग्यच असेल आणि योग्यच घडेल. आपले प्रयत्न म्हणजे त्याची भाषा ओळखणे, म्हणजे मन शुद्ध करणे.
बदल, परिस्थिती, गुंतागुंती, भावना, विचार, चक्र, घडामोडी, झिज, अवलंबून भाव, आवाज, आकार, प्रतिक्रिया, अनुभव, परिणाम हा दैवी प्रवाह आहे/ दैवी क्रिया आहे. त्याच्या क्रियेतून अनेक स्तर, अनेक चक्र, अनेक स्वभाव, अनेक वृत्ती, अनेक विचार - भावनांचे जग, अनेक अनुभव निर्माण होतात. To "become" is the only reality of Existence. It will become. It will keep becoming. असे असताना घडामोडी मनाला का लावून घ्यावे? हेतू का असावा?! सध्या हेतू ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. तरीही जे फळ मिळतील, त्याच्या पाठीमागे खूप सूक्ष्म स्तरात भगवंताची शक्ती काम करत आहे, हे मनाला सांगत राहणे. आणि तीच जग चालवते आणि आपल्याला निर्णय घ्यायला भाग पाडते. म्हणून कार्य करणे, हे देखील त्याने योजिले आहे, तर ते करायलाच हवे...
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home