श्री
श्री
क्षण...
कुठल्याही कृतीचा किंव्हा क्षणाचा परिणाम कसा सर्व व्यापी होऊ शकतो, ह्याची पूर्ण कल्पना बुद्धीला येणे अवघड आहे, कारण आपली बुद्धी " क्षणावर " केंद्रित राहते. _क्षण_ म्हणजे बिंदू, अनेक बिंदुंचा संबंध आणि त्या बद्दलचे विचार - हे सर्व गोष्टीही " क्षण " दर्शवतात. आपलं अख्ख जीवन देखील एका क्षणासारखे आपली बुद्धी बघते. " मी " हा अहं भाव देखील " क्षण " म्हणून बुद्धी बघते. आणि लगेच हेतू निर्माण करून कृती करायला भाग पाडते. आपण चंचल राहतो.
ह्याचा अर्थ की सध्या अस्तीत्व आपण मर्यादित जाणीवा मध्ये आणल्यामुळे, आपल्याला जीवन दिसते आणि संबंध भासतो आणि दृष्याशी संपर्क येतो. त्यातून विचार आणि भावनांचे चक्र. त्यातूनच आकार किंव्हा शरीर. म्हणजे आपण खूप विषयाधिन किंव्हा क्षणातीत वावरत राहतो म्हणून प्रचंड कष्ट, चिंता आणि भीती बाळगतो. हे त्या " क्षणाचे " परिणाम आहेत. मग क्षण झाली एक अस्तित्वाची _स्थिती_ .
आपली जाणीव जर क्षणावर केंद्रित राहिली नाही पण अनंत प्रवाहाकडे केंद्रित केली तर बुद्धी आणि भावना वेगळ्या पद्धतीने अस्तीत्व मानायला लागतील. त्यात " मी " हा भाव मावळू शकतो आणि नवीन भाव किंव्हा सूक्ष्म भाव त्या ठिकाणी स्थिर होतो. अजून सूक्ष्म झालो तर भगवंत भावांमध्ये स्थिरावले जातो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home