Tuesday, November 19, 2024

श्री

 श्री 


विश्व असणे आणि त्यातील घडामोडी होत राहणे हे प्रसादा प्रमाणे स्वीकारावे लागते. कोण करते, का होते हे प्रश्न येत असावेत, पण त्यातून अस्वस्थ होणे की शांतीने ते घडू देणे - हीच शिकवण आहे. थोडक्यात अस्तित्वाचा अर्थ अनुभवणे. 

हे प्रश्न येतात कारण मनोरचना तशी घडवली गेली आहे. मन हे शक्ती आहे, क्रिया आहे, कार्य आहे, आणि त्याचे परिणाम आहेत. ते परिणाम जाणीवेच्या रचनेमुळे निर्माण होतात. म्हणजे आपण असतोच, शक्ती प्रकट होत असते आणि त्या प्रकट होण्याचा परिणाम कसा होतो आणि काय करून घ्यावा हे डोळसपणे बघणे आले. तीच शक्तीचे जागे होणे आहे. शक्ती आहे भगवंताची, तशी ती आपल्याला जाणवायला हवी, म्हणजे स्वतःचे विषय सोडायला हवे. "मी काहीतरी करतो; असेच असायला हवे" वगैरे भावना सोडायला हव्यात. गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नाही, ह्यातच भगवंताच अस्तीत्व आणि कृपा दिसून येते! म्हणजे गोष्टी प्रसाद म्हणूनच स्वीकारणे आले आणि अपेक्षा बाजूला सरणे आले. सर्व काही अस्तीत्व जाणवते, ते भगवंताचे कार्य आहे. 

आपल्यात खुप धिमेपणा वाढवायला हवा. बुद्धी शांत झाली की तो आपोआप अंगी येतो. सतत काहीतरी करत राहणे ही तापदायक वृत्ती आहे. उलट काहीही न करणे, हा भाव उत्पन्न करायला खूप ताकद लागते. ताकद येणे म्हणजे सहन करणे होत नाही - शुध्द होणे आणि समाधानी राहणे हे आहे.

अर्धवट वाटणे, अनेक गोष्टी दिसत राहणे, बदल चिंतेत पाडणे, तात्पुरते वाटणे - याचा अर्थ की शुध्द होण्याचा मार्ग पत्करायला हवा आणि अस्तीत्व काय आहे, हे अजून कळणे आले. 

त्यासाठी त्या शक्तीची प्रार्थना करणे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home