श्री
श्री
अस्तित्व तिथेच असते. गोष्टी प्रकट होणे, बदलणे, विरघळून जाणे, संबंधित राहणे आणि हे चक्र सुरू राहणे हे अस्तित्वाचे कार्य आहे किंव्हा गुण धर्म आहे. अस्तित्व आहे, म्हणून वरील गोष्टींचे रूप प्रकट होणार, त्याचा परिणाम होणार, वेगळेपण जाणिवेत येणार, प्रतिक्रिया होणार, आकलन होत जाणार आणि शांती भावाकडे जीव पोचणार. ह्यातील प्रत्येक टप्पा भगवंताने योजिले आहे - त्याची इच्छा आहे, संकल्पना आहे, कार्य आहे. असण्याला अंत नाही - किंबहुना "नाही" ही स्थिती अस्तित्वातच नसते! म्हणून अस्तित्वाची शक्ती सर्व ठिकाणी कार्य करत राहते, सर्व ठिकाणी पसरलेली असते, आत आणि बाहेर असते, आणि सर्व स्तरांमध्ये तिचा वावर असतो.
आपल्या ध्यानी मनी गोष्टी वेगळे भासतात, किंव्हा दूर वाटतात. ही संकल्पना आहे. मग ते जाणून घेण्याचे प्रयत्न करतो. ते जरी झालो तरी "इतर गोष्टी" त्या प्रमाणे वेगळ्या दिसतात आणि अपुरेपणाचा अभाव कमी होत नाही! म्हणजे आपल्यात काहीही बदल झाला किंव्हा प्रयत्न केला गेला, तरीही ह्या नाव रूपाच्या समुद्रात आपण सैरबैर पोहोतच राहतो! आपण काहीही नाही केले, तरीही मनात बदल येत असल्यामुळे, इतर जगाशी संबंध बदलणारा आणि तात्पुरता वाटतं राहतो! म्हणजे चैन नाही!!
थोडक्यात जाणिवेचा स्वभाव सध्या असा आपण केला आहे, की त्यात वृत्ती उमतल्यामुळे असंख्य बदलणाऱ्या आणि परावलंबी राहणाऱ्या स्थितीला सामोरे जायला लागते! हा खेळ कोण मांडू पाहते?
त्याच्यातून घडामोडींच्या पलीकडे किंव्हा महाकारण ते काय, हे जाणवू शकेल. त्याचा अनुभव घ्यावा. म्हणजे तसे आपण व्हावे, शांत व्हावे, शुध्द व्हावे, नामस्मरण करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home