श्री
श्री
संकुचित झाल्यामुळे हालचालींचे भास होतात, परिणाम होतो आणि _कर्म_ करण्याची व्याख्या येते. मी किंव्हा देह किंव्हा रूप किंव्हा साखळी हे कर्म करण्यास भाग पाडतात, आणि त्याला आपण चिकटून राहतो.
वास्तविक, हालचालींचे कारण प्रकृतीमुळे उद्भवते. प्रकृतीचे गुण रूप, देह, अहं ह्या पद्धतीत उठून येत असतात. आपण प्रकृती हे _सत्य_ ओळखत नाही, म्हणून हालचालींना भोगतो. प्रकृती हा अखंड आणि शांत असणाऱ्या भगवंताचे शक्ती रूप आहे. अस्तित्वाला पुरुष आणि प्रकृती अशी व्याख्या दिली आहे. पुरुष म्हणजे भगवंत म्हणजे आत्मा म्हणजे स्थिरता म्हणजे space or consciousness. प्रकृती म्हणजे रूप म्हणजे बदल म्हणजे form.
जाणीव शुद्ध असली की भगवंत प्रकट होतो आणि तीच जाणीव अस्थिर असते तेव्हा जीव हा भाव वावरत असतो. जाणीव थोडक्यात संबंध प्रकट करतात अस्तित्वाशी. त्यात आपल्याला शांती रस जाणवते किंव्हा दृश्य स्वरूप. हे कसे होते, हे गूढ रहस्य आहे. त्या दोन्ही स्थितींचे असणे आणि कशाला सत्य म्हणायचे आणि कशाला निर्मिती किंव्हा कृती किंव्हा कार्य हे सहविस्तर बऱ्याच ग्रंथांमध्ये सांगितले असते.
मन, हे देखील जाणीव शक्ती रूप आहे. त्या स्पंदनातून जे काही होते, त्यातून रूप आणि आकार दिसून येते किंवा भाव धारण केले गेले असते. म्हणून नामाचा संस्कार देत गेलो की स्पंदनाच रूपांतर शांतीत होते, असे संतांचे सांगणे आहे. आपली dnyan शक्ती दृश्य भावाच्या ही पलीकडे जायला हवी, जे कार्य नामस्मरण करून आणते.
दृश्य भाव असे का, ह्याने आपण अधिक त्याचेच चिंतन करतो. त्या पेक्षा जर ध्यान नामाच केलं तर आपण शांती रस अनुभवू आणि दृश्याचे संबंध विरघळून जातील किंवा त्याची गरज भासणार नाही. म्हणून दृश्य समजून कोड सोडवण्यापेक्षा आरंभी नामावर श्रद्धा ठेवा असे संत सांगतात. योग्य तो परिणाम होईलच.
हरि ओम.
श्री
सतत काहीतरी खटपट करत राहणे ही वृत्ती का असते? आणि खूप केले, हिशोब ठेवला, साखळी रचली, विचार केला, पटकन केले, तर समाधान असते का? समाधान मिळवता येते का _वस्तू प्रमाणे?!_
म्हणजे वस्तू ही संकल्पना आहे. ती मिळवण्यासाठी काहीतरी हालचाली, क्रिया, कर्म करणे आले ज्याच्यामुळे ती अनुभवात येते. स्थिर ही स्थिती नसल्यामुळे, वस्तूची संकल्पना किंव्हा तिच्याशी संबंध देखील बदलत राहतो आणि जे पदरी पडतं कायम ते म्हणजे असमाधान! म्हणजे मिळवण्याचा अट्टाहास शेवटी निकालास जातो!
आता त्याच्या उलट काहीही मिळवणे नको, असे जरी म्हणले तरी आत वृत्ती असल्यामुळे कुठली ना कुठलीतरी गोष्ट किंव्हा वस्तू अनुभवात येतेच! त्याला भोग म्हणतात.
वरील दोन्ही पद्धतीतून दिसून येते की वासना जर असली, तर त्याचे फळ भोगावे लागतात.
हे चक्र शांत करण्यासाठी नामस्मरणाचा अनुभव आत्मसात करायला लागतो.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home