श्री
श्री
सगळ्याच गोष्टी तात्पुरत्या असतात, स्थळही, वेळही आणि आपणही. त्यात सुद्धा अनेकपणा असतो आणि ह्या सर्व हालचालींची क्रिया भगवंताची शक्ती घडवून आणते, ती _कारण_ ठरते.
मग काय साठवावे आणि कशाला आणि कुणासाठी? आणि काय सिद्ध करावे? सर्व भगवंत करतो, तर माझे कर्तृत्व काय?! हा महत्वाचा प्रश्न आहे आणि काही प्रमाणात तापदायक तर आहेच. उत्तर कळण्यासाठी मुद्दामून काही करणे, हे ही अभिप्रेत नाही. जाणीव शुद्ध होणे, हे अनुभवातून घडते आणि त्यात साखळी, घटक, संबंध, बदल, अर्थ हे गुढतेने वावरत असतात. आज इथे मी लिहिले तरी तो प्रयत्न स्थिर होण्यासाठीचा आहे. होईलच, अशी शाश्वती नाही. शाश्वती नाही, म्हणून श्रद्धेच स्थान आहे.
मुख्य पाया जीवनाचा जो आहे, तो श्रद्धेचा असतो. त्याच्या कर्तृत्वावर काहीही करणे शक्य असते आणि समाधानी होणे हे ही शक्य असते. समाधान होण्याची दिशा एक रेघ किंव्हा सरळ मार्गाची असेल असे काही सांगता येत नाही. प्रारब्ध कसेही वाट्याला येऊ शकते, कधी देह सरळ जाईल, कधी वाकड्यात जाईल, कधी गचका खाईल तर कधी ताठ उभा राहील. परिस्थिती (देह/ आकार/ रूप) कसेही हालचालींमध्ये असले, तरीही समाधानी स्थितीत स्थिर राहायला हवे. म्हणून समाधानी होणे हे परिस्थितीवर अवलंबून _नसते_.
ते कळण्यासाठी नामस्मरण करणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home