श्री
श्री
शंका आणि शोध हे शक्तीचे जागे होणे आहे. मूळ आहे ती जाणीव. जाणीवेच्या प्रभावाखाली सर्व संबंध, अनुभव, साखळी, दृश्याचा अर्थ, परिणाम आपण भोगतो. हे वेग वेगळे घटक जरी वाटले एकमेकात गुंतले गेलेले, त्याचे केंद्र बिंदू आहे जाणीव. म्हणजे जाणीव क्रिया अशी विस्तारलेली असते, ज्याला आपण घटक ह्या भाषेत समजून घेतो.
म्हणून जाणीव मर्यादेची क्षमता किंव्हा पोच दर्शवते. जेवढी जाणीव शुद्ध, सूक्ष्म, तितकी तिची पोच जास्ती, विचार जास्ती विस्तारलेले, घटकांचे dnyan अधिक प्रबळ वगैरे.
म्हणून अभ्यास जो आहे, शोध जो आहे, तो जाणीव शुद्ध होण्याचा आहे. अभ्यास केला नाही, तर जाणीव आणि त्यावरून होणारा प्रभाव तोच राहतो आणि अधिक घट्ट होण्याची संभावना असते. म्हणून शंका घेण्याला महत्वाचे स्थान आहे, कारण त्याने आपण स्वतःच्या मर्यादांवर शंका घेतो आणि अधिक विस्तार होण्याचा प्रयत्न करत राहतो. तसे होणे आहे.
पण हा प्रवास ज्याने त्याने हाती घ्यावा. कोण कधी घेईल, कुठल्या निमित्ताने घेईल आणि कसे त्याचे रेखाटन करेल आणि त्यावरून जात राहताना कसे अनुभव आत्मसात करेल, हे काळच ठरवेल. त्यासाठी प्रत्येक मानव जीवाला अमाप आशीर्वाद देऊन त्याच्यावर श्रद्धा ठेवावी आणि सैय्यम बाळगावा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home