Monday, April 21, 2025

श्री

 श्री 


मनात ठेवलं तर आतल्या आत चक्र सुरू राहतं आणि हालचाली जाणवतात. बोललं गेलं तरीही हालचाली जाणवतात आणि दृश्याशी सरमिसळ होते. दृश्यांचे स्तर आहेत, म्हणून बाहेरील आकार बघणे काय किंव्हा आतील क्रियांवर, रुपावर लक्ष देणे काय - दोन्ही दृश्याचे रूप दर्शवतात. त्याला दुसरे नाव म्हणजे "संकल्पनेची स्थिती". म्हणजे _संकल्पना_ होऊ पाहणे ही _क्रिया_ आहे आणि त्या क्रियेचा _परिणाम_ असतो, जो भाव निर्माण करतो आणि त्यामुळे गुंतून ठेवतो "जीवाला". 

भावानेच स्वरूप किंव्हा संकल्पनाच रूप सार्वजनिक मूल्य घेऊन प्रकट होऊ शकत किंव्हा खाजगी मूल्य. वास्तुकलेत हा प्रवास बघितला जातो आणि एखादी कलाकृती सार्वजनिक मूल्य दर्शवते की खाजगी हे आपण पारखून घेऊ शकतो. खाजगी मूल्य उपयोगाचे का नाही कारण ती विघटित क्रियेतून, तात्पुरती संकल्पनेतून आणि स्वार्थी हेतूमुळे निर्माण झाली असते. काय दिसते ह्याचे बीज "हेतूवर" अवलंबून आहे आणि काय निर्माण करतो, ह्याचे परिणाम खूप खोलवर रुजू होतात - स्वतः त्या व्यक्तीला आणि समाजाला. म्हणून डोळस पद्धतीने कलाकृती काय मांडली जाते, ह्याकडे सगळ्यांनी बघावे. हा मुद्दा उडवण्याचा नाही आहे. 

त्या अर्थाने स्थळ आणि काळाशी आपले नाते असते - ते सार्वजनिक, दैवी उद्भवले आहे की खाजगी असते ते बघावे. पर्यावरण खाजगी वस्तू आहे की सार्वजनिक की दैवी उद्भवलेली? अगदी माणूस म्हणाला तर तो जीव खाजगी असतो की सार्वजनिक का दैवी उद्भवलेला?

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home