श्री
श्री
शांत आणि प्रेम आणि आपुलकी हे आत येण्यासाठी खूप अनुभवातून जायला लागते. अंतर्मुख होणे आणि शुद्ध होण्याची ती क्रिया आहे. अनुभव आपण टाळू शकणार नाही, किंव्हा ते टाळू ही नये. कारण प्रत्येक अनुभवेच प्रयोजन असते आणि ते स्वीकारले तर ते आत परिवर्तन घडवून आणू शकते.
अनुभव बाहेरून आत जातो, संस्कार मधून जातो, लिखाण, ऐकण्यातून, बोलण्यातून जातो, विचारातून जातो, कृतीतून जातो. तसंच आतून बाहेर तो प्रकट होत राहतो.
अनुभव किंव्हा वासना निर्माण करून त्याचे पर्यवसान कुठल्यातरी रूपात आणि कार्यात घडणे हा अस्तित्वाचा गुण आहे. हे होणार. निर्माण करत राहणे आणि हालचाली दर्शवणे असे असणार अस्तित्वात.
प्रश्नाचा शोध देखील अनुभव निर्माण करतो. उत्तर मिळत नाही, ह्या विचारांनी देखील आपण शांतीच्या मार्गाला लागतो. म्हणजे शांती संक्रांत होणे हे विचारांच्या अधिक गूढ क्रिया आहे आणि ते होईल कालांतराने. ते कधी, कुठे, कसे, केव्हा, किती होईल हे भगवंताच्या गुण धर्मावर सोडणे.
शांत होणे हे परिवर्तन घडून होते. परिवर्तनात खूप दुःख, त्रास, सैय्यम, सहनशीलता, त्रयस्थ गुण, शिव्या - शाप ह्या साऱ्यातून जायला लागू शकते आणि ह्यातून जाताना प्रतिक्रिया *न* देणे हे ठरवायला लागत.
प्रतिक्रिया देऊन काय होतं असे स्वतःला विचारायला लागतं. त्यातून काय सिद्ध होतं? भसम्या रोग झाला असावा आपल्याला. जाणीवेच्या प्रभावाखाली आपण ते विचार आणतो, ते कृती करतो, ते संबंध जोडतो आणि ते अपेक्षा ठेवतो आणि शेवटी दुःखी होतो. सर्व अपुरे आहे, तर का कष्टी व्हावे? प्रश्न दृश्याचे रूप झगडत सुटतात का कधी? नाही सोडवले तर काय बिघडते? कुणाचे बिघडते?
आपण स्वतः कुणाला पुरून राहणार आहोत? किती करणार आहोत? आणि कोण, कुठली वस्तू आपल्याला पुरणार आहे? प्रवाह आहे सगळा. जे येणार ते जाणार किंव्हा परिवर्तन पावणार. जे असणार, ते असणार. जे जाणार, ते जाणार.
आपण शांत रहावे. आपल्याने काहीही अवलंबून असत नाही आणि कुणीही आपल्यावर अवलंबून असत नाही. लोकं आणि त्यांच्या स्वभावाचे मूळ त्यांनाही माहीत नसते. आपण असे का वागत राहतो, हे माहित नाही. सैय्यमाने घेणे आहे सर्व गोष्टी आणि जमेल तसे माफ करणे सगळ्यांना आणि स्वतःला. मोकळे व्हा.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home