श्री
श्री
भगवंत आपल्याला, कुठल्याही काळात आणि परिस्थितीत सोडत नाही. म्हणजे कुठल्याही दृश्याचा रूपात, भगवंताचा पाया असतोच, त्याचे कार्य असते, त्याची इच्छा असते. बदल जरी झाले, तरीही त्याची संकल्पना भगवंत देतो. म्हणून साखळीचे रूप गूढ असतात आणि ते त्याचे कार्य दर्शवतात, हे ध्यानात राहू देणे.
नाम घेत असताना त्याचे परिणाम आणि त्याचे संबंध आपल्याशी आणि द्वैत प्रकरणाशी कसे होतील, त्याची चिंता करू नये. जे योग्य व्हायचे ते होतील. _नामाने मी ह्या संकल्पनेचा उद्धार होतो आणि त्याच बरोबर द्वैताचाही._ म्हणजे शांती भाव संक्रांत होते.
हे जरी स्पष्टतेने हरिपाठ ह्या अभंगात संत Dnyaneshwar ह्याने सुचविले असले, तरीही "ते कसे होते" अशी शंका घेण्याची गरज नाही. आणि ती शंका जरी आली, तरी नाम घेणे सोडू नये. त्यातूनच श्रद्धेची वाढ होत राहील आणि गुंता सुटेल. मग उद्धार कसे होते, ह्याचा ही अनुभव स्पष्ट होईल.
तात्पर्य हे, की नामावर श्रद्धा स्थिर ठेवणे. स्थिरावणे देखील क्रिया आहे जी सहज, कालांतराने साध्य होते. आज म्हणाल तर "पटकन" साध्य होणे अवघड, कारण अस्थिर राहण्याची आपल्याला सवय झाली असते. दृश्याचा परिणाम ढिले करण्यास अनेक जन्म प्रयास करायला लागतात, असे संतांचे म्हणणे आहे. परत, ढिले करणे म्हणजे पळून जाणे नाही, पण स्वस्थ होणे, शांत होणे, तळमळ थांबणे, श्रद्धा वाढणे, सत्य कळणे, जाणीव सूक्ष्म होणे असे सर्व सूचित आहे इथे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home