Sunday, April 27, 2025

श्री

 श्री 


स्थळ, काळ आणि कृतीचे कुठलही _रूप_ प्रेमातून येतं किंव्हा त्यात प्रेम ही भावना केंद्रस्थानी असते किंव्हा प्रेमातून सर्व घडामोडी _प्रकट_ होत राहतात. दुसऱ्या अर्थाने प्रेम म्हणजे शुद्ध अस्तित्व किंव्हा अद्वैत किंव्हा अंतर्मुख असणे किंव्हा निरहेतू किंव्हा सूक्ष्म किंव्हा ज्याला रूप + आकार _नाही_. ते प्रेम होण्यासाठी तिथे मनाने ध्यान करायला लागतं. त्या प्रेम भावनेला शब्द दिला आहे *भगवंत*. आपण भगवंताचे ध्यान करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे शुद्ध प्रेम होण्याचा प्रयत्न करतो. 

स्मरण प्रेमाचे हवे, आपली मूळ अवस्था अस्तित्वात वावरण्याची. ती अशी स्थिती आहे की "मी" ह्याचं स्मरण देखील राहत नाही आणि जे काही माध्यम _उरतं_ ते असत फक्त प्रेम किंव्हा भगवंत. सर्व खटाटोप जो आहे तो ही स्थिती होण्याचा आहे. 

बऱ्याच लोकांच्या ध्यानी ही बाब येत नाही स्वतःच्या उतावळेपणाच्या रहस्य बद्दल. आणि जरी आली, तरी मार्गामध्ये स्वतःची वृत्ती बरेच अडथळे आणते. आणि ते अडथळे पार करण्यात अपार प्रयत्न, सैय्यम ठेवायला लागतो. हे करून देखील पूर्णपणे शरण जर गेलो तर भगवंताची कृपा होण्यात मदत होते. त्याचे परिणाम म्हणजे मन एकदम स्थिर होते. 

ह्या मार्गाचे महत्व पटायला लागते. त्या मार्गात जाताना अवस्था येतात. तेही शांतीने आत्मसात करायला लागतात. भगवंताचे किंव्हा उत्कंठ प्रेमाचे दर्शन व्हावे ही तीव्र इच्छा हवी, तरच हे साधेल. 

त्याची सुरुवात आणि शेवट म्हणजे नामस्मरण.

हरि ओम.


श्री 

बुद्धीने संकल्पना मांडणे आणि अनुभव घेणे ह्यात फरक असतो. संकल्पना जरी मांडता आली, तरी ते व्यवहारात येताना पूर्ण अस्तित्वाच्या साखळीत समवायला लागतात - म्हणजेच की ती बौद्धिक न राहता पूर्ण अंतःकरण व्यापायला लागतं. त्यात सर्व घटक आलेच. आणि त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध गूढ असतात, ते शब्दात किंव्हा संकल्पनेच्या भाषेत नेहमी मांडता येतात असे नाही. म्हणून _श्रद्धा_ लागते. भगवंता बद्दल सांगणे आणि भगवंताचा _अनुभव_ घेणे हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सांगणे ही क्रिया सावली सारखी आहे - अनुभव घेतल्या नंतरचा टप्पा आहे. कुठलेही रूप किंव्हा दृश्यांची स्थिती सावली सारखी असते, जी भगवंतामुळे प्रकट होते किंव्हा नंतर येते (विघटित असते, अपूर्ण असते, रूप घेऊन असते, बदलत असते, अस्थिर असते, परावलंबित असते, वावरत असते)...

म्हणून सर्व दृश्यांच्या रूपाला भगवंताचा पाया असतो (उर्ध्व स्थिती - apriori). म्हणून ही हेतू ठेवणे ही सावली सारखी असते, तो सत्य भाव कसा असेल?! 

असो, भगवंताच्या इच्छेने प्रकृती कार्य करते - म्हणजे पदार्थांचे होणे, वावरणे, मोडणे, परत जोडणे वगैरे. त्या गुणांना चिटकून राहिल्यामुळे ते कार्य मी करतो हा भास होतो आणि त्यातून भोग अनुभवतो. 

हा सर्व प्रकार गूढ आहे. ते स्पष्ट होण्यास भगवंताचे चिंतन करणे हाच उपाय आहे. दृश्य रूप, त्याचे परिणाम, संबंध, वासना, बदल हे झेलणे आहे शांतीने. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home