श्री
श्री
आतील गूढ विचार किंव्हा भावना अनुभवातून निर्माण होतात. ते बोलू नये किंव्हा सांगू नये किंव्हा ऐकू नये हे कसे शक्य आहे आणि काय केले की त्या गूढ भावना शांत होतील?
एक तर आपण भाव धारण करून जन्म घेणे ही क्रिया असते. तो जन्म घेतल्यावर बदलांमुळे भावनेचे स्तर होतात आणि त्यांच्या आत गूढ संबंध होतो. तो ही होत राहणार. ते का होते, कसे होते, केव्हा होते हे सर्वस्वी भगवत कार्य आहे, म्हणून चिंता नसावी. त्या साखळीतील अनेक दृश्यांची स्थिती आणि अदृश्य प्रकारांचा समावेश असेल. ते ही संबंध कसा असतो, हे गूढ आहे. म्हणजे मानवी अनुभव होत राहणार आणि त्यातून आपल्याला जायला लागणार, कुणी काहीही म्हणो. ते जे काही दर्शवते, ते बदलणारे, तात्पुरते असते आणि म्हणून आपण काही पकडू शकत नाही आणि ठेवायचे म्हणून काही राहत नाही.
वासना कितीही तृप्त ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी ते बदलत राहते म्हणून त्यावरून परिस्थिती बदलत राहतात. म्हणून ध्येय वासनेवर स्थित नसावा, स्थिरतेच्या जाणिवांवर घडावा.
हरि ओम
0 Comments:
Post a Comment
<< Home