श्री
श्री
साखळीच्या कुठल्या घटक्याला धरावे?! एकही वस्तू, पदार्थ, बिंदू, घटक स्थिर नाही, किंव्हा "निर्मितीच्या" गुणांनी रूप घेऊन अवतरले असते, तर त्याला का धरावे?
सत्य माहित नाही, म्हणून हे धरणे, धारण पावणे, सतत प्रतिक्रिया देणे, अपेक्षा ठेवत राहणे, कृती करणे, पटकन हालचाली करणे, बेचैन होणे वगैरे गोष्टी होतात आणि त्याचे संस्कार मनात रुजू होतात. आपण चिंता, त्रास, तळमळ करून घेतो कारण दृश्यात वावरणाऱ्या क्रियाशी आपण एकजीव होतो. त्या क्रियांचे स्मरण ठेवतो, त्यातून अहं वृत्ती घट्ट करतो आणि कष्टी होतो. हे त्या शक्तीचे परिणाम.
जो काही दृश्याचा अनुभव घेतो, गिळतो, आत्मसात करतो, त्यातून संस्कार होतात आणि त्यात आपण गुंतून राहतो. मग कुणीही काहीही म्हणा, आपण साखळीच्या वर्तनाला धरून ठेवतो. साखळी, सध्या, आपलं अस्तित्व घडवते. हा विचार करतांना, आतील अमूर्त क्रियाना आपण मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो आणि योग्य मार्ग निवडतो. It is all a part of the process of _imagination_.
नक्की साखळी आहे आणि त्यात अनेक चक्र किंव्हा घटकांचा संबंध होत दृश्य जगाचा अनुभव तैय्यार होतो - त्याला "द्वैत" ही उपमा दिली आहे. साखळी गूढ आहे आणि दैवी उद्भवलेली आहे, म्हणून सत्य हे आहे, की त्या होण्याला, त्या कार्याला हेतू नाही. मग आपण हेतूची व्याख्या तात्पुरतेपण ह्यावर का अवलंबून करावी?! बदल हा नैसर्गिक, किंव्हा अस्तित्वाचा गुण धर्म आहेच, तर त्याला शांतीने का नाही बघावे?
मी, म्हणे एक अस्तित्वच बदलणारं, परावलंबित राहणार, तात्पुरतं रूप. त्यावर इतर गोष्टी समोर येतात आणि निघून जातात. त्याचा कसा अनुभव घ्यावा?!
तसंच, वृत्ती किंव्हा वासना कुठली, काय, कधी, कशी प्रकट होईल ते सांगता येत नाही आणि ते पूर्णपणे भगवंताच्या स्वाधीन आहे. पुढची वासना माहीत नसते, म्हणून कार्य भगवंताचे असते, आपले नाही..
खूप बोलून किंव्हा गप्प बसून किंव्हा कृती करून योग्य परिणाम होतील असे नाही. तरीही कार्य करायला आणि भगवंत जाणून घ्यायला कुणी कुणाला थांबवत नाही. आपण आलोत, तर आपण भगवंत जाणून घेण्यासाठी. ते शक्य आहे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home