श्री
श्री
शक्ती माध्यम हे अस्तित्व आहे. जिथे अस्तित्व आहे, तिथे शक्तीचे कार्य होणार. शक्तीचे कार्य म्हणजे स्पंदन, साखळी, घटक, रूप, भाव, संबंध, आकार आणि जाणीव. अस्तित्व आणि शक्ती हे वेगळे नाहीत. शुद्ध जाणिवेला, किंव्हा शुद्ध शक्तीला भगवंताचे अस्तीत्व आपण स्वीकारतो.
शक्तीचा परिणाम हा की आतून स्पंदने अदृश्य सूक्ष्म स्वरूपात बाहेर येताना स्थूल आणि दृश्यात परिवर्तन होतात. ते होताना बरेच आकार किंव्हा बदल किंव्हा हालचाली ते अनुभवात आणतात. त्याला आपण प्रतिक्रिया देतो आणि ते चक्र सतत चालू ठेवतो. म्हणजे सर्व संकल्पनेचा किंव्हा समजुतीचा खेळ आहे. शक्तीमुळे होणारे स्मरण किंव्हा जाणीव, ह्यामुळे एक प्रकारचे अस्तित्व आपण उपभोगतो.
म्हणून नामावर श्रद्धा बसायला हवी. नाम ही शक्ती सर्व विश्व चालवते, असे पक्के मनात खोल रुजायला हवे. त्यासाठी होणारी प्रक्रिया म्हणजे अंतर्मुख होणे.
तिसरी गोष्ट अशी की विश्वात रचना असते. म्हणून आपल्या कृतीचे फळ आपल्याला भोगायला लागते, त्यातून कुणाचीही सुटका नाही. हे जरी असले, तरी जाणीव शुद्ध केली तर येणारे अनुभव शुद्ध नजरेने स्वीकारून त्याकडे आपण 'निमित्त' म्हणून बघू शकतो, म्हणजे आकुंचित हेतूने दृश्याला पकडून ठेवण्याची गरज नाही.
"मी" जाणीव खूप खोल गेली असते. तिचे रूप आणि परिणाम आत जाताना वेगळा होत राहतो, जो सामान्य दृश्यात पटकन कळणे अवघड असतं. म्हणून नामाची शक्ती आत जायला हवी, म्हणजे वासनेचे उच्चाटन होते आणि मन अतिशय शुद्ध होते.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home