श्री
श्री
जाणीव असणे हे शक्तीचे गुण आहे. शक्ती जिवंत आहे, ह्याचा अर्थ ती जाणीव रूप आहे, ती कार्य करते, ती गुंतून राहते, ती संबंधित राहते, ती अनुभव घेते, तिला भाव असतो आणि त्यावरून ती विचार करते. एका दृष्टीने शक्ती स्वयं सिद्ध असते, तिचे अस्तित्व असते, म्हणून तिचा _परिणाम_ असतो.
शक्तीच्या क्रियेतून आभास होतो. आपल्यासाठी दृश्य जगाचे संबंध खरे वाटून येतात - ही प्रक्रिया गहन आहे आणि साखळीमुळे प्रत्ययास येते. प्रश्न असा आहे, ह्या प्रक्रियेत वावरताना की "आपण कोण आहोत आणि काय आहोत आणि कसे वावरत राहतो?"...ह्या प्रश्नाचे उत्तर ओळखणे म्हणजे शक्तीचे जागे होणे किंव्हा जाणीव अधिकाधिक शुद्ध होत जाणे, सूक्ष्म होणे.
ज्याला "मी" असे म्हणतो, ते शक्तीचे कार्य आहे, भाव आहे, प्रक्रिया आहे, अनुभव आहे, चक्र आहे, परिणाम आहे, भोग आहेत...पुढची चिंता असणे आणि सतत प्रपंचात गुंतून राहणे हे ह्या शक्तीचे भाव आहेत. हा भाव _कुठून_ निर्माण होतो? तर ते शुद्ध स्थितीतून. प्रत्येक घटनेला _कारण_ आहे, ते आपल्याला कळत नाही एवढंच आहे. ते होण्याचे प्रयोजन काय, हा शोध आहे आपल्यासाठी.
त्या शोधाला दुजारा द्यायला नामात राहण्याचा प्रयत्न करणे.
हरि ओम.
श्री
कोडी सोडवण्याचा अट्टाहास असू नये. म्हणजे जाणीव अशी होऊ देणे की सर्व हालचालींना शांतीने बघणे, स्थिरतेने बघणे. हे ही प्रयत्नाने, कृपेने आपोआप घडू देणे. श्रद्धा वाढवत राहणे. _कारण_ ही संकल्पना आहे आणि त्यातून गोष्टींची भूमिका आपण बघतो. गोष्टींचे होणे, येणे, वावरणे, जाणे , हे प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करतो. _मूळ असणे_ ही देखील संकल्पना आहे आणि त्याच्या शोधात आपण असतो. वरील दोन्ही गुण शक्तित असते, म्हणून हे प्रश्न आपल्यालाही असतात.
शक्तीला गुण आहेत म्हणजे हे. तरीही गुणाचे वर्णन करणे म्हणजे शक्तीतून वेगळे असणे. आपण शुद्ध शक्तिरूप झालो, तर गुण सांगायला कोण असणार आहे आणि कुणाला?! थोडक्यात अंतर्मुख होणे, हा त्या प्रवासाचे ध्येय म्हणता येईल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home