श्री
श्री
प्रश्नांचे उत्तर कालांतराने स्पष्ट होतात, कारण जाणीव सूक्ष्म होते म्हणून व्यक्तींचे गुण, वृत्ती, स्वभाव, सत्संगत, संबंध हे भगवत इच्छित आहे, असे स्वीकारणे शांत मनाने आणि सामोरे जाणे. प्रतिक्रिया देऊन काय होते, कसा परिणाम होतो हे ओळखावे आणि योग्य पाऊल उचलावे.
मूळ समस्या स्वतःची आहे. अनुभव काय असतो आणि कुठल्या पद्धतीने तो एक भाव प्रकट करतो हे बघावे. विचार करणे हा प्रयत्नच आहे, जागे होण्याचा किंव्हा शांत होण्याचा. शांत स्वरूप कुठलेही रूप, स्थळ, काळ आणि कार्य घेऊन येईल. ते ही स्वीकारावे. किंबहुना _तेच_ हिताचे आहे, हे ओळखावे. शांती लाभेल, अशी श्रद्धा बाळगावी, कारण तो नैसर्गिक गुण आहे आत्म्याचा, तर त्याच दिशेने वाटचाल होईल आपली. आलेले अनुभवाचे प्रयोजन त्याचसाठी आहे, शोध त्याचसाठी आहे, उतार चढाव त्याचसाठी आहे, स्वीकारणे त्याचसाठी आहे.
वृत्तीचे आयुष्यात स्थान असावे, कारण सर्व गोष्टी भगवताकडून प्रकट होतात, तर वृत्तीला नाही कसे म्हणायचे?! एखादी वृत्ती अशी का आली, आणि हे रूप का घेऊन आली किंबहुना एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा उलगडा आत्ता का करतो, ह्याला तसे उत्तर नाही किंव्हा स्वार्थी हेतूच्या चष्म्यातून बघू नये आणि प्रतिक्रिया ही देऊ नये.
मुळात खाजगी हेतू ठेवून दृश्याशी संबंधित राहणे हिताचे नसते आपल्यासाठी. कण हून कण अस्तित्व शक्ती तिच्याकडे बुलावा करत आहे, तर तिचं ऐकणे म्हणजे योग्य मार्ग होत असावा.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home