Tuesday, May 06, 2025

श्री

 श्री 


बेचैनी वाटणे म्हणजे विघटित असणे. तीच स्थिती स्थिरताकडे आणते. म्हणून बेचैनीला घाबरू नका. ती नैसर्गिक पायरी समजावी सूक्ष्म होण्याची आणि एकरूप होण्याची. विघटित असताना बुद्धिही तशीच वागत असते, म्हणून तिने दिलेले उपाय विशेष उपयोगी असतात असे नाही. 

बुद्धी एकाग्र आणि शांत होण्यासाठी नामस्मरण करायला सांगितले आहे. आपलं मूळ स्वरूप काय आहे आणि कशातून आपण होतो, हे ओळखण्यासाठी नामस्मरण करावे. 

उपद्व्याप करायला किंव्हा कोडी सोडवत राहायला कुणी जबरदस्ती करत नाही. आपण ती ओढुन घेतो फुकट, म्हणून त्रास होतो. प्रकृतीचे गुण धर्म ओळखून शांत रहावे. आपण कशानेही ठरत नाही, आणि जग आपल्यावाचून अडत नाही. जे होणार, ते होणार. जे येणार ते जाणार. जेव्हा येणार, तेव्हा येणार. 

अदृश्य भाव सांगण्याचा ठेका आपण घेतलेला नाही. घेऊ ही नये. तो सांगता येत नसेल, तरी जे योग्य व्हायचे ते होईलच, ह्यावर श्रद्धा ठेवावी. 

आपण सामान्य आहोत, आणि ते काही विचित्र नाही. आपल्याकडे शाश्वती नाही, पैसा नाही, आपण शुद्ध नाही. _काहीही असो_, इथूनच सुरुवात आहे समाधानी होण्याची. कुणाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही, कुणाला काहीही वाटून घेण्याची गरज नाही. आणि आपणही काही वाटून घेण्याची गरज नाही. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home