श्री
श्री
कळत न कळत आपण _देत_ असतो अस्तित्व शक्तीला - रूप, आकार, शब्द, चक्र, विचार, भावना...
देत राहणे, ही क्रिया समजली हवी, बदलणारी, गुंतवणारी, तात्पुरती, वेगळेपण भासवणारी. देत राहताना एक भाव निर्माण होतो, ज्याचे स्मरण ठेवले जाते आणि त्याचे चक्र किंव्हा संकल्पना उमटत राहतात. All is a present continuous tense. त्या अर्थाने आकार (form) होत राहते.
आपण धरणे किंव्हा टाळणे योग्य नाही. आपल्या जवळ काहीही बाळगले, तरी वेगळ्या पद्धतीने अनुभव मनात संक्रांत होतात. जे काही पेरू, त्याचे झाड होणार.
देणे थांबत नाही, जो पर्यंत बीज आत असते - त्याचे पाया आणि मुळे आणि फांद्या आणि फळे होणारच. कृती घडणारच, अनुभव होणारच, प्रभाव पडणारच.
म्हणून जाणीव ही आहे, की आपण नसतो, आपण काहीही करत नसतो. आपल्या निमित्ताने, देत राहणे क्रिया चालू राहते आणि पूर्ण देणे झाले अस्तित्वाला की आपण शांत होतो, त्या शक्तित विलीन होतो.
देत राहणे महत्वाचे आहे. त्याची सतत आठवण राहण्यासाठी नामस्मरण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home