श्री
श्री
आपण सतत कुठेतरी गुंतलेलो असतो, संबंधात असतो. विघटन क्रिया हा देखील संबंधाचा प्रकार आहे, तसेच एकरूप होणे हा देखील संबंधच आहे. काय करतो आपण, ज्यामुळे एका प्रकारचे संबंध बनत राहतात आणि कुठले भावना त्यामुळे निर्माण होतात, हे ओळखावे.
प्रगती - जी काही बोलली जाते बऱ्याच वर्षांपासून किंव्हा समजुतीत आणली जाते, ती म्हणजे शारीरिक आणि वैचारिक प्रगती. त्यामुळे होते काय, की विघटित क्रिया (किंव्हा खाजगीपणा) वाढत राहते आणि ते अंतःकरणाला घातक ठरते. म्हणजे सर्व संकल्पनाच, विचारांच, भावनांच मूळ अंतःकरणात आहे. ते स्थिर होण्यास प्रयास आहेत.
रूपाला, संकल्पनेला, कृतीला, आकाराला धरू नये किंव्हा त्यापासून पळून जाऊ नये. दोघांचेही परिणाम सारखेच.
काही समाज सर्वातून पळून जाण्याचा अट्टाहास धरते, पण त्यातून जर स्मरणच पुसून गेले तर अस्तित्वालाच धक्का दिल्या सारखे होते! स्मरण फक्त व्ययक्तिक क्रिया नसून, खूप विस्तारलेली असते, म्हणून संबंध डोळसपणे बघायला लागतात.
तसंच काही समाज मोजक्या स्मरणांना घट्ट धरून ठेवते, की ते दगडासारखे न बदलणारे होते आणि ते शेवटी बोजड होऊन त्याला टाकून द्यायला लागते.
म्हणून गोष्टी कुठून येतात, कसे येतात, का येतात आणि कुठे जातात, हे ओळखावे. त्यात आपले कर्तृत्व काय, आणि आपण काय देणे लागतो, हे बघावे. त्यामुळे पूर्वीच्या गोष्टी, आत्ताचा काळ, उद्याचे होणे, ह्याकडे कसे लवचिक पद्धतीने बघावे, हे समजून येऊ शकते.
असा एखादा तरी प्रश्न विचारा की सर्व संबंधाच्या तळाशी काय असते? संबंधांचा पाया कोणता? आपण संबंधित राहतो, म्हणजे काय? आणि का राहतो? कसे राहतो? उत्तर आहे - प्रेम भाव जो अस्तित्वाच्या मुळाशी आहे. अस्तित्वाचं अंश आपल्यात असल्यामुळे, आपल्या अंतःकरणात प्रेमच आहे, जे वर गढूळ आणि स्थूल होऊन वेगळ्याच पद्धतीने आकारात उमटतं.
संतांच्यामध्ये आणि आपल्यात हाच फरक आहे. ते शुद्ध प्रेमात असल्यामुळे कुठलेच विषय, घडामोडींचा स्पर्श त्यांना पोहोचत नाही आणि त्यात ते गुंतत नाही. आपण मात्र विषयाला धरून राहतो, म्हणून शुद्ध, सूक्ष्म, अदृश्य प्रेमापासून आपण वंचित राहतो. त्यामुळे आपण घडामोडी भोगतो आणि त्याचे परिणाम आपल्या अनुभवात आणि कृतीत येतात. आपण कष्टी होतो.
म्हणून जाणीव शुद्ध करणे, म्हणजे जे उरते ते फक्त प्रेम भाव, जे स्वतः सिद्ध असते. त्यासाठी नामस्मरण.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home