श्री
श्री
मनात काही गोष्टी किंव्हा बदल होण्याची गरज असते आणि ती न सांगणे किंव्हा न सांगता येणे, ह्याचं *स्थान* तर असतेच. सर्व गोष्टी स्पष्ट करायला हव्यात किंव्हा ते मांडायला हव्यात हा अट्टाहास आहे, नैसर्गिक नाही असे वाटते. खरे पाहिले तर स्थिर होण्याचा प्रक्रियेत शब्द रूप वापरणे कमी होत जाते. ह्याचाच अर्थ की शब्द रुपाच्याही सूक्ष्म स्थितीत मनाचा शिरकाव होतो, म्हणून त्या स्थितीचे वर्णन विश्लेषणाच्या पद्धतीने करायला लागत असावे. इथे विश्लेषण म्हणजे गूढ स्थितीचे वर्णन किंव्हा अनुभव.
सर्व ग्रंथ ह्यांची भाषा जर पाहिली तर ती अशी असावी. त्या भाषेचा मतितार्थ कळण्यासाठी ते आचरणात आणायला लागते. ग्रंथात लिहिलेल्या गोष्टींचे तत्व विस्तारलेले आणि सूक्ष्म असतात, म्हणून त्यांचा अर्थ कळण्यासाठी वेळ देणे महत्वाचे आहे. तेच तत्व सत्संगतीला लागू असते.
बदल होण्याची क्रिया, संबंध होण्याची क्रिया गूढ आहे आणि मानव बुद्धीच्या पलीकडची आहे. ह्याचे दोन अर्थ निघतात - एक म्हणजे _मानव_ निर्माण झालेले रूप आहे शक्तीचे, ज्याचा मूळ संबंध भगवंताशी असतो आणि दोन म्हणजे सर्व गोष्टी भगवंत करतो म्हणून त्या होण्यावर श्रद्धा ठेवणे आणि स्थिर होणे हिताचे आहे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home