Wednesday, May 21, 2025

श्री

 श्री 


रूप आणि आकाराचे प्रयोजन एवढेच असते की त्यांच्या पलीकडे जाऊन फक्त शांती भाव आत्मसात करावे किंव्हा त्यात स्थिर होणे. 

ह्याचा अर्थ असा की दृश्य, संबंध, क्रिया, आकार, भाव हे निर्मितीचे घटक आहेत आणि ते सर्व शांत करता येतात. सध्याचा भाव वेगळा असल्यामुळे आपल्याला अनेकपणात व्यवहार करणे भाग आहे. हे कोण निर्माण करते? तर त्याचे उत्तर असे आहे, की भगवंत माध्यम करते, त्याची शक्ती करते. 

अस्तित्वाचा भाग होणे, म्हणजे शक्तीचे कार्य ओळखणे, आपण शक्तीच होणे. "मी" ही देखील संकल्पना शुद्ध शक्तीतून निराळे असल्यामुळे, दृश्य मला _भासते_. 

तिथून _गुंता_ निर्माण होतो. गुंता ही देखील आपल्या भावनेतून झालेली संकल्पना आहे.  आपल्याला असे वाटत राहते की जो पर्यंत गुंता सुटत नाही, तो पर्यंत मला सुख अनुभवता येणार नाही. हे विधान पारखले हवे.

गुंता सुटण्याचे बरेच कारण गूढ असतात, अदृश्य स्थितीत असतात. मग तो दृश्य जगात कसा काय सुटेल?!  अदृश्य आणि दृश्याचा संबंध गूढ असतो, म्हणजे तो सरळ अजिबात नाही. दृश्य कसेही असले, तरीही त्यातून अदृश्याकडे झेप घेता येते. जी क्रिया अपेक्षित आहे, ती फक्त करावी - म्हणजे श्रद्धा वाढवणे. बाकी सर्व भगवंत करेल.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home