श्री
श्री
सिद्ध किंव्हा हेतू असणे व्यवहारात किंव्हा क्षण घालवण्यात, ह्या मताचा पलीकडे मला यायचे वाटते.
क्षण कसा येतो, कुठून येतो, कसे गुंतून ठेवतो, काय दाखवतो, कसा बदलत राहतो, कसा जातो, काय साखळीत समावेश करतो, ह्यात आपला काही हात नसावा. हे मान्य केलं, तर कदाचित अर्धी काळजी तिथेच गळून पडेल. थोडक्यात अनुभवावर आपला हेतू मिसळू नये.
मग हेतू प्रकरण खूप गूढ आहे. ते का असते आणि त्याचे परिणाम कसे होतात हे ही गूढ प्रकरण आहे, म्हणजे त्याची जाणीव व्हायला आतून शांती भाव किंव्हा निवांतपणा लागतो.
हेतू गळून गेला किंव्हा उद्भवला नाही, किंव्हा प्रकट होण्याची गरज उरली नाही, तर सिद्ध होण्याची धडपडही निघून जाईल. आपण स्वतः सिद्ध माध्यमात आहोत, नव्हे तेच माध्यम आहोत हे जाणवेल.
पूर्ण जीवन जाणिवेची भाषा ओळखण्याचे आहे, सिद्ध करून दाखवण्याची नाही.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home