Tuesday, May 27, 2025

श्री

 श्री 


एकमेकांशी, इतर रूपांशी, इतर आकारांशी, इतर घटकांशी संबंध दुरावतो, तेव्हा होणारा आतील भाव त्रासिक होतो. बिना संबंध कुठलाही घटक जगू शकत नाही. आपली व्यक्तिगत स्वातंत्र्य ह्याची व्याख्या कुठे जात आहे, हे पारखावे. व्यक्ती स्वातंत्र्य जर भावनिक एकटेपण देणारं असेल, तर ती संकल्पना पडताळून पहायला हवी. 

प्रगतीच्या नावाखाली आपण जर बघितलं तर गेल्या काही शतक आपण "विघटित क्रियाना" खूप दुजोरा दिला आहे भरपूर गतिमान, वेगवान, प्रगतिशील, आर्थिक भरभराट वगैरे होण्याच्या इच्छेपोटी. 

त्याचे ताणतणाव सामाजिक, संस्कृती, व्ययक्तिक भावनांवर उमटले गेले आहेत आणि माणूस एकलकोंडा, विभक्त, स्वकेंद्रित (स्वतःच्या कोषात), हिंसा करणारा, बेचैन, त्रासिक झालेला दिसतोय. थोडक्यात आलेल्या मानसिक स्थितीचे आरोग्य बरोबर नाही. त्यातून होणारे चर्चा, संबंध, क्रिया, कार्य, संकल्पना अधिकाधिक विभक्ताच्या पार्श्वभूमीवरून येत आहे. 

त्यासाठी काही पाऊल उचलली हवी. आपण विभक्त झालो आहोत. इथून जगाकडे बघण्याची सुरुवात करून, "आपण पूर्ण आहोत, एकच आहोत" इथ पर्यंतचा भावनिक प्रवास करायचा आहे. 

मूळ प्रश्न खरा आध्यात्मिक आहे. जाणीव न शुद्ध केल्यामुळे ९९ टक्के लोकांची संकल्पना विघटन अधिक करण्याच्या मागे आहे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home