श्री
श्री
श्रद्धा भाव आतील फुलतो. आतील म्हणजे त्याला दृश्याच्या भाषेत किंवा स्वभावात मांडणे कठीण. आणि कदाचित हेच सर्वात मोलाचे dnyan असावे, की दृश्यात राहून सुद्धा, श्रद्धेने वावरत राहणे शक्य आहे. असेही म्हणता येईल की दृश्यात जर कुठलीही एकमेव स्थिर आणि शाश्वत वस्तू असेल तर ती आहे श्रद्धा. बाकी सर्व वस्तू, आकार, पदार्थ, रूप हे अस्थिर असतात म्हणून गुंतून असलेले, बदलणारे, तात्पुरते, वेगळे असतात.
जेव्हा जर तर ची वळवळ मनातून कमी होईल, तेव्हा समजून घ्यावे की श्रद्धा प्रज्वलित होत आहे. श्रद्धेने सारे प्रश्न, कुठलेही प्रश्न मावळतात, त्याचा विपरीत परिणाम होत नाही, ते चिंता प्रकट करत नाही. स्वतःची चिंता देखील मावळत असावी.
रूपावरून, आकारावरून किंव्हा कुठलाही हेतू ठेवून क्रियेवरून स्वतःला पारखू नये किंव्हा संकल्पना मांडू नये. मी कशावरूनही ठरत नसतो, सिद्ध होत नसतो, समाधान पावत नसतो, अपेक्षित होत नसतो, व्याकुळ होत नसतो, वाट बघत नसतो.
दृश्यात उत्तर नाही. किंव्हा कुठल्याही प्रश्नात उत्तर नसते. हे एकदा कळले की आपण स्वस्थ होतो. प्रश्न म्हणलं तर सोडवण्याची अपेक्षा आली, ती आली की क्रिया आली, क्रिया झाली की फळ आले, फळ मिळाले की चिंता आली टिकवण्याची आणि त्यातून नवीन प्रश्न....हे चक्र ओळखता आले पाहिजे, की आपण कशात गुंतून राहतो आणि का. प्रपंच एक चक्र भाव आहे. कोण कधी येतो आणि जातो आणि काय घडत राहत आणि कशावरून आणि कुठे आणि कधी आणि कसे, असे चक्र अनुभवात वावरणे म्हणजे प्रपंचच तो! ह्याची काळजी किती करावी आणि कशासाठी?!
चक्र मावळण्याचं रसायन म्हणजे नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home